Suspected house burglars detained by the Railway Security Force here. esakal
नाशिक

Nashik Crime News : रेल्वे सुरक्षा दलाकडून संशयित घरफोडे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मुंबई येथील वसई पश्चिम भागात एका वृद्धेच्या घरी घरफोडी करून साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपये घेऊन रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना नाशिकरोड सुरक्षा दलाच्या जवानांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. (Nashik Crime Suspected house burglars arrested marathi news)

याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी सांगितले की, मुंबई येथील वसई पश्चिम भागातील आनंद नगर, अंबा भवनमध्ये राहणाऱ्या कल्पना नंदकुमार मोरे (वय ६५) ह्या ७ मार्च रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास किराणा आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या.

काही वेळात त्या पुन्हा घरी आल्या तेव्हा त्यांना घर उघडे दिसले व कपाटातील ३६ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ३५ ग्रॅम सोन्याचा हार, ४५ ग्रॅम सोन्याचे पाच जोड रिंग, १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम सोन्याची चैन, १०० ग्रॅम चांदीचे पैंजण व रोख रक्कम चार लाख रुपये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत वसई पश्चिम येथील माणिकपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. (latest marathi news)

हा तपास सुरु असताना नाशिकरोड येथील रेल्वे सुरक्षा बल यास रेल्वे सुरक्षा दलाचे मंडल सुरक्षा आयुक्त एच श्रीनिवास राव यांनी सूचना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी मुंबईकडून भुसावळकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले.

पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश यादव, आरक्षक मनीष कुमार सिंह, दीपक सानप, धर्मेंद्र यादव, समाधान गांगुर्डे आणि कर्मचारी नाशिकरोड स्थानकात आलेली काशी एक्सप्रेस तपासात असताना गाडीच्या एस ३ मध्ये तीन संशयित दिसले. त्यांना पोलिस आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी आपले नावे महम्मद शहीद खान (वय ३७, रा. प्रेम नगर, गोरेगाव वेस्ट), लाल केसर ददनराय (वय २७, रा. गणेश चौक, शांती पाडा, वसई) व राकेश कुमार रामराज यादव (वय ३३, रा. न्यू मुलुंड लिंक रोड, गोरेगाव वेस्ट) असल्याचे सांगितले.

त्यांना निरीक्षक यादव यांनी विश्वासात घेतले असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख २९ हजार ७०० रुपये रोख तर १५ ग्रॅम सोन्याचे पैंडल, दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याच्या बाळी, एक सोन्याची नथ असा ऐवज हस्तगत केला. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्याला अवगत केल्यानंतर तेथील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुनील पाटील आणि पथकाने तिघांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT