The suspect was arrested along with Gavthi Katta from Gorewada area. Along with the team of Unit Two of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : फोटोग्राफरकडे सापडला गंजलेला गावठी कट्टा

Nashik Crime : नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे सापळा रचून २० वर्षीय संशयिताला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे सापळा रचून २० वर्षीय संशयिताला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने कारवाई केली असून, फोटोग्राफर असलेला संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून समोर आले आहे. पियुष नितीन दोंदे (२०, रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime suspected photographer has been arrested)

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार मनोहर शिंदे यांना संशयित दोंदे याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेनुसार गोरेवाडी-शास्त्रीनगर रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

संशयित दोंदे या रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ आला असता दबा धरून असलेल्या पथकाने अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गंजलेल्या अवस्थेतील गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (latest marathi news)

याप्रकरणी युनिट दोनचे अंमलदार समाधान वाजे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी उपनिरीक्षक अजय पगारे, मनोहर शिंदे, स्वप्निल जुंद्रे, विशाल कुवर समाधान वाजे, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, प्रकाश महाजन, संजय सानप, तेजस मते यांनी बजावली. संशयिताला तपासाकामी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT