school & Bribe Taking teachers esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: मुख्याध्यापकासह शिक्षकाला लाच घेताना अटक; सातपूरच्या गुप्ता विद्यालयात ACBची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : श्रमिकनगर येथे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इमारती निधीच्या नावाखाली १० हजारांची लाच स्वीकारताना शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्रमिकनगरमधील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात सदरची कारवाई शनिवारी (ता. ११) दुपारी केली. (Nashik Crime Teacher along with Principal arrested for taking bribe)

सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (५६), दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (५७) असे श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या लाचखोर मुख्याध्यापक व उपशिक्षकाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, त्यांनी दोन मुले सातपूरमधील महापालिकेच्या शाळेमध्ये मराठी माध्यमात सातवीच्या वर्गात शिकत आहेत.

परंतु तक्रारदार हे मूळचे बिहारचे असल्याने ते हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचणी येत होत्या. हिंदी माध्यमाच्या श्रमिकनगरमधील श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात त्यांच्या मुलांसाठी प्रवेश घ्यायचा होता.

त्यासाठी त्यांनी गेल्या २९ एप्रिल रोजी शाळेचे मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना भेटून मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी भेटले. त्यावेळी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी दोन मुलांसाठी प्रत्येकी ८ हजार रुपये याप्रमाणे, १६ हजार रुपये इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली. मात्र या निधीची कोणतीही पावती मिळणार नसल्याचेही सांगितले होते. (latest marathi news)

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाने पडताळणी केली. त्यानुसार, तक्रारदार हे शनिवारी (ता. ११) पुन्हा गुप्ता हिंदी माध्यमिक शाळेत मुलांच्या प्रवेशासंदर्भात भेटले. त्यावेळी लाचखोर मुख्याध्यापक व शिक्षकाने पंचासमक्ष इमारत निधीच्या नावाखाली १० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतला. यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली.

याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, प्रणय इंगळे, सुनिल पवार, सचिन गोसावी, दीपक पवार यांनी बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT