Nashik Crime News : म्हसरुळ परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत अपहरण करून त्याच्याकडून १२ लाख ३० हजारांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली असून तिघे संशयित पसार आहेत. दरम्यान, संशयितांनी खंडणीच्या पैशातून खरेदी केलेली महागडी कार, सोन्याचे दागिने, दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. (Nashik Crime team of Unit One of City Crime Branch arrested three who kidnapped and extorted money)
आदित्य एकनाथ सोनवणे (२४, रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंक रोड), तुषार केवल खैरनार (२८, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, म्हसरुळ), अजय सुजित प्रसाद (२४, रा. अंबड लिंक रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राजेशकुमार गुप्ता (रा. म्हसरुळ) यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्यांच्याकडेच कामाला असलेल्या एका संशयिताने गुप्ता यांच्याकडे पैसे असल्याची खबर मुख्य संशयित तुषार खैरनार याला दिली होती.
खैरनार याचाही फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. मात्र त्यात तो कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने सहा संशयितांना एकत्रित करून गुप्ता यांच्या अपहरणाचा आणि त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा कट रचला. त्यानुसार, त्यांनी ४ मार्च रोजी गुप्ता यांना सुयोजित गार्डन येथे फोन करून बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून कारमध्ये बसून तिघे संशयित देवास (मध्य प्रदेश) ला घेऊन गेले.
तर, नाशिकमध्येच असलेल्या संशयित आदित्य, तुषार व अजय यांनी गुप्ता यांच्या पत्नीला फोन करून १२ लाखांची मागणी केली. त्यानुसार १२ लाखांची रोकड मिळताच संशयितांनी गुप्ता यांना देवास येथून सोडून दिले होते. गुप्ता यांनी नाशिक गाठून पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, म्हसरुळ पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. (latest marathi news)
ही कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, विष्णू उगले, महेश साळुंके, मिलिंदसिग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, रवींद्र बागूल, विशाल काठे, प्रदीप म्हस्दे, नाझीम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांच्या पथकाने बजावली.
सापळा रचून जेरबंद
या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे युनिट एकच्या पथकाने करीत अंबड लिंकरोड परिसरातील दत्त मंदिरापासून संशयित आदित्य सोनवणे यास अटक केली. त्यानंतर तुषार व अजय या दोघांनाही अटक केली. तर तीन संशयित अजूनही पसार आहेत. खंडणीचे १२ लाख संशयितांनी आपसांत वाटप करून घेतले.
संशयित आदित्यने मोपेड, ॲपलचा मोबाईल, सोन्याच्या रिंगा खरेदी केल्या. त्याच्याकडून २९ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह खरेदी केलेला ऐवज असा १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर, संशयित तुषार व अजय यांच्याकडून शेवरलेट कंपनीची क्रूज कार, ॲपलसह व्हिवोचा मोबाईल, असा ३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
संशयितांकडून एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, आदित्यविरोधात अकोला, सिन्नर पोलिसात आर्मॲक्टचे गुन्हे, तुषारविरोधात मारहाण व विनयभंगाचे गुन्हे तर अजयविरोधातही मारहाण, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.