Nashik News : शहर परिसरातील उपनगरांमधून दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यामुळे दुचाकी मालकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, दिवस-रात्र असलेली पोलीस गस्त कुचकामी ठरते आहे. शहरातून पुन्हा पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. शुभम मत्सागर (रा. गोकुळ हाईटस्, पेठरोड) यांची ५० हजारांची दुचाकी (एमएच १५ जेपी ०००५) १९ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. (theft of two wheelers in city)
याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचीन भीमराव माळी (रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांची ५० हजारांची दुचाकी (एमएच १८ बीएस ०९४१) ४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी दिंडोरी रोडवरील राज स्वीट समोरील दुभाजकाजवळ पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कीर्ती कुलदीप विभांडिक (रा. उमा दर्शन, धात्रक फाटा) यांची २० हजारांची मोपेड ॲक्टिवा (एमएच १५ एफसी ५५५३) गुरुवारी (ता. १८) रात्री ७ ते ९ या दरम्यान राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)
निकिता संजय सनानसे (रा. कृष्णाधाम अपार्टमेंट, ध्रुवनगर) यांची ४० हजारांची दुचाकी (एमएच १५ जेके २३३६) ११ तारखेला दुपारी चार ते पाचच्या दरम्यान राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, रवींद्र राजधर बोराडे (रा. श्रमनगर, उपनगर) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ एई ९५७३) १४ तारखेला नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिससमोरील झाडाखाली पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.