Extortion Crime esakal
नाशिक

Nashik Crime: ओझर येथे डॉक्टरांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा; डॉ. विश्वनाथ पाटील यांच्याकडे मागितली 6 लाखांची खंडणी

Crime News : रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रक्कमचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

ओझर : येथील बाजारपेठेत असलेल्या श्री. सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रक्कमचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik Crime Three booked for extortion from doctor at Ozar)

काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या श्री. सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या. महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले. त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली.

रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक रक्कम नातेवाईक देण्यास राजी झाले. मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहायता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले.

उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी ६७५०० रोख स्वरूपात जमा केले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम संचालक डॉ. विश्वनाथ पाटील यांनी उदार दायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले. नातेवाईकांनी देखील डॉक्टरांचे आभार मानत सत्कारही केला.

काही दिवसांनंतर रुग्णाचे जावई म्हणून योगेश नाना पाटील व जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी असे तिघांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहायता निधी येऊनही पेशंट कडून रोख रक्कम का घेतली, असा जाब विचारला. त्यावर डॉ. विश्वनाथ पाटील यांनी नातेवाईकांना सांगितलेली सर्व हकीकत पुन्हा जावई म्हणून योगेश पाटील याला सांगितली.

परंतु योगेश नाना पाटील हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तू हॉस्पिटल कसे चालवतो बघून घेतो म्हणत दमबाजी करत शिवीगाळ केली. दुसऱ्यादिवशी डॉ. पाटील यांनी पुन्हा योगेश यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विषय थांबवायचा असेल तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, असे सांगत थेट खंडणीची मागणी केली.

यावर सामाजिक भान लक्षात घेऊन डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्नही केला. पण तिघांची दमबाजी देऊन रक्कम मागणी सुरूच असल्याने जेरीस आलेल्या रुग्णालय प्रशासनाने मुख्यमंत्री सहायता निधीची आलेली रक्कम देखील परत शासनास पाठवून दिली. नंतर प्रकरणात कुठलेही तथ्य उरलेले नसताना तिघांनी खंडणीची मागणी सतत सुरू ठेवली. (latest marathi news)

अखेरीस खंडणी रक्कम देण्यास डॉ. पाटील यांनी नकार देताच तिघांनी सोशल मीडियावर बदनामी सुरू करत स्टंटबाजी केली. अखेर डॉ. विश्वनाथ पाटील यांच्यासह ओझरच्या डॉक्टरांनी अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर ओझर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यात योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले आणि अन्य एक अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनकर वाघेरे करत आहे.

दोघे मनसेचे पदाधिकारी?

योगेश नाना पाटील आणि जयेश वासुदेव ढिकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याचे बोलले जाते. योगेश नाना पाटील याने मागील काळात रोलेट विरोधात अशीच स्टंटबाजी सोशल मीडियावर केली होती. योगेश पाटील आणि जयेश ढिकले दोघेही मनसेचे निफाड तालुक्यातील पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.

तीही बाब फिर्यादी डॉ. विश्वनाथ पाटील यांनी निदर्शनास आणून दिली असता वर गेले तर वीस लाख लागतील आम्हाला सहा लाख द्या आणि विषय संपवा म्हणत मागणी सुरू ठेवली. परंतु मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाटील आणि ढिकले यांच्यावर कारवाई करण्याचे सांगत पक्ष याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT