मालेगाव : येथील माजी महापौर अब्दुल मलिक युनूस यांच्यावर झालेला गोळीबार हा व्यवसायिक वादातून झाला आहे. गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या सोळा तासात या गुन्ह्याचा छडा लावत शेख मन्सुर बशीर उर्फ मोहम्मद मन्सुर (वय २१, रा. आयशानगर) व खलील अहमद अब्दुल रज्जाक (वय ४०, रा. म्हाळदे शिवार) या दोघांना अटक केली.
गोळीबाराचा हा प्रकार म्हाळदे शिवारातील जमीन व्यवहाराच्या वादातून झाला आहे. दरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फारुक पटेल व अन्य एका संशयितानेही अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याचे निष्पन्न झाल्याने पटेल याच्यासह दोघांविरुध्द दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी मंगळवारी (ता. २८) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Nashik Crime Two arrested in former mayor Abdul Malik shooting case)
दरम्यान अटक केलेल्या दोघांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. माजी महापौर अब्दुल मलीक यांच्यावर जुन्या महामार्गावरील सुप्रिम बिल्डींग मटेरियलसमोर हल्ला झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
त्यांना या हल्ल्यात पायाला, हाताला व बरगडीला अशा तीन गोळ्या लागल्या होत्या. हाताला लागलेली गोळी चाटून निघून गेली. बरगडी व पायातील गोळी नाशिक येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन काढण्यात आल्यानंतर मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अब्दुल मलिक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचा मित्र रिहान शेख सलीम (वय ४०, रा. इमदादनगर) यांच्या तक्रारीवरुन शेख मन्सुर बशीर व खलील अहमद रज्जाक या दोघांविरुध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शस्त्रास्त्र विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याउलट सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या तक्रारीवरुन फारुक पटेल व अन्य एका संशयिताविरुध्द सामान्य नागरीकांच्या जिवीताला धोका होईल अशा सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याच्या आरोपावरुन व भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. (latest marathi news)
जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, श्री. भारती, सहाय्यक पाेलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, म्हस्के, उपनिरीक्षक संदीप पाटील, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक अनिल पठारे, शांताराम पाटील, नावकर, हवालदार गोरखनाथ संवत्सकर, प्रविण सानप, किशोर खराटे, हेमंत गरुड, देविदास गोविंद, शरद मोगल, नरेंद्र कोळी, दत्तात्रय माळी, योगेश कोळी, गिरीष बागुल, तान्हाजी झुरडे, हेमंत गिलगिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रकाश बनकर, योगेश ठाकूर, रवी काळे, पंकज डोंगरे, दादासाहेब मोहिते, अमोल शिंदे आदींच्या पथकाने मन्सुर शेख व खलील अहमद या दोघांना अटक केली.
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून नसून व्यसायिक वादातून झाला आहे. तथापि परस्पर विरोधी तक्रारी झालेले दोन्ही कुटुंब राजकीय असून त्यांच्यात पुर्वापार वैमनस्य आहे. अब्दुल मलिक हे माजी नगराध्यक्ष युनूस ईसा यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्यावरील हल्लयातील संशयित मन्सुर शेख हे माजी आमदार आसिफ शेख यांचे चुलत बंधू आहेत.
ज्या म्हाळदे शिवारातील जमीन व्यवहाराच्या वादातून हा हल्ला झाला त्याच जमिनीच्या वादातून यापुर्वी माजी महापौर अब्दुल मलिक व माजी स्थायी समिती सभापती (कै.) खलील शेख यांच्यातही गोळीबाराचा प्रकार घडला होता. या वादात यापुर्वी पवारवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.