Nashik Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : निवाणे ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायतीमधील ‘पेसा’ योजनेंतर्गत आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, माजी सरपंचासह पेसा योजनेतील माजी अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी की, आदिवासी गावांत पेसा योजनेंतर्गत विकासासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. ( two sarpanch in police custody in case of embezzlement )

मात्र, या निधीचा प्रत्यक्ष विकासासाठी उपयोग न होता निधी अपहार झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. निवाणे येथे २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप उर्फ महेश पाटील याच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आले होते. यातील सरपंच आणि पदाधिकारी आदिवासी व अल्पशिक्षित होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे. येथे गेली पाच वर्ष विकासकामे न करता पैशांचा अपहार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

२०१६ ते २०२१ दरम्यान कळवण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या निवाणे ग्रामपंचायतमधील पेसाअंतर्गत व शासकीय योजनेतील निधीचा लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निवाणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागूल (रा. अभोणा), सरपंच बेबीबाई शिवाजी सोनावणे (रा.निवाणे) व पेसा अध्यक्षा यशोदाबाई विठोबा माळी (रा. निवाणे) या तिघांविरोधात १४ ऑगस्ट २०२३ रोजी कळवण पोलिस ठाण्यात ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कळवणचे विस्तार अधिकारी युवराज सयाजी सोनवणे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्यात आली होती.

संशयित आरोपी सरपंच पेसा सदस्य असतांना मुल्यांकने व ठराव ग्रामपंचायतीच्या दप्तरी मिळून आले नव्हते. संशयित आरोपी ग्रामसेवकाने २०१७ ते २०१८ या कालावधीत ग्रामनिधी व ग्रामीण पाणीपुरवठा निधी कराच्या रकमा वसुल करून जमाच केल्या नाहीत. त्यामुळे ही रक्कम कोठे खर्च करण्यात आली, याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. २०१७ ते २०२१ पर्यंतचे रेकोर्ड निवाणे येथे उपलब्धच झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील एकूण रकमेत संशयित आरोपींनी अपहार केल्याप्रकरणी शनिवारी (ता. ६ जुलै) तिघा संशयितांना कळवण पोलिसांनी अटक केली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

राजकीय वरदहस्ताची चर्चा

या गुन्ह्यातील अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता असून, आणखी काहीजण यामध्ये असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे कोणी व कसे खर्च केले?. त्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलिस करीत आहे. या प्रकरणी आणखी काही अधिकारी व राजकीय नेते गळाला लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आदिवासी गावांमध्ये कामे न करताच लाख रुपयांचा अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे कोणत्या राजकीय नेत्यांचा हात आहे. याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT