Money Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Crime : लासलगाव पोलिसांची दोन पथके उस्मानाबादला रवाना! दामदुप्पट योजना प्रकरणातील दुसऱ्या संशयिताचाही शोध सुरु

Latest Crime News : दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत असून त्यास लवकरच ताब्यात घेण्यात यश येईल, असे निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून दामदुपटीचे आमिष दाखवून सुमारे ५० लाख ८६ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यासाठी दोन स्वतंत्र पोलिस पथके उस्मानाबादला रवाना झाली आहेत. दरम्यान, दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत असून त्यास लवकरच ताब्यात घेण्यात यश येईल, असे निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Two teams of Lasalgaon police left for Osmanabad)

फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताचा ताबा घेण्यासाठी पोलिसांनी उस्मानाबाद न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. त्यानुसार दोन पथके उस्मानाबादला रवाना झालेली आहेत. तेथून सतीश काळे या संशयितास ताब्यात घेण्यात येईल व दुसरा संशयित योगेश काळे याच्या शोधासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.

भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये संघटित गुन्ह्याबाबत कलम वाढविण्यात आल्याची माहिती डॉ. पालवे यांनी दिली. स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयात सुमारे जवळपास आठ हजार नागरिकांना गंडा घालणाऱ्या सतीश काळे व त्याचा साथीदार योगेश काळे यांनी विविध आमिषे दाखवून फसवणूक केली आहे.

याप्रकरणी तिसऱ्या दिवशी फसवणूक झालेली एकही व्यक्ती तक्रार नोंदवायला आली नाही, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते डी. के. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक झालेल्या एका शिष्टमंडळाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यथा मांडल्या.

भुजबळ यांनी नाशिकच्या पोलिस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून सदर व्यक्तींची प्रॉपर्टी सील करता येईल का, ठेवीदारांचे पैसे देता येतील का किंवा जाण्यापूर्वी सदर व्यक्तीने ट्रान्सफर केलेले पैसे परत आणता येतील का तसेच यावर काय तोडगा काढता येईल अशी विचारणा करीत तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

सील केलेल्या बंगल्याचा सर्रास वापर

यापूर्वी सतीश काळे यांनी ढोकेश्वर मल्टीस्टेट को.ऑप. च्या माध्यमातून राज्यातून मोठी माया जमवली होती. तथापि ठेवीदारांचे पैसे न दिल्याने त्यांना या प्रकरणी शिक्षा झाली होती. त्यावेळी त्यांचा टाकळी (विंचूर) येथील बंगला सील केला होता. मात्र शिक्षा भोगून आल्यानंतर बंगल्याला लावलेले पुढील सील तसेच ठेवून मागील बाजूने बंगल्याचा सर्रास वापर चालू आहे. घरातील फर्निचर व सुखसोई बघता सदर वास्तू कोट्यधिशाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

थायलंड विमानवारीचे दिवा स्वप्न

या योजनेत जास्त पैसा जमा करण्यासाठी ग्राहक व दलाल यांना विमान प्रवासाचे आमीष दाखवून थायलंडची वारी करावयास मिळणार होती. त्यासाठी दोन दिवसात पासपोर्ट काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच काळे मोठी माया जमा करून फरार झाला.

संपर्कातील व्यक्तींची कॉल तपासणीची शक्यता

कोणीही माहिती देण्यासाठी समोर येत नसल्यामुळे वेळ पडल्यास प्रसंगी शेवटच्या पाच ते सहा महिन्यात सतीश काळे याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे कॉल डिटेल्स काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

"२०२१ मध्ये सतीश काळे याने स्थापन केलेल्या राज्यातील ढोकेश्वर मल्टीस्टेट को.ऑफ. च्या माध्यमातून मागील गुन्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलिस स्टेशनमध्ये स्वतःला अटक करून घेतली. न्यायालयाच्या परवानगीने सदर व्यक्ती ताब्यात घेण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर दोन-तीन दिवसात त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात घेतली जाईल."

- विक्रम देशमाने, पोलिस अधीक्षक ग्रामीण नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT