Two suspects who went to the showroom and stole clothes. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : खरेदीच्या बहाण्याने कपडे चोरणारे दोघे जेरबंद; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कॉलेजरोडवरील कपड्याच्या शोरुममध्ये २८ हजारांच्या कपड्यांची खरेदी करून बिल भरताच पोबारा करणार्या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघा संशयितांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद केले असून, त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( Two who stole clothes on pretext of shopping arrest by police)

मोहमंद अन्वर सैयद (२९, रा. प्रज्ञानगर, नानावली), प्रविण उर्फ चापा लिंबाजी काळे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनल रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कॉलेजरोडवरील कॅन्टाबिल शोरुममध्ये २५ मे रोजी दोघा संशयितांनी कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले. संशयितांनी दुकानातून पॅंट, शर्ट, टीशर्ट, परफ्युम, बरमुडा असा सुमारे २८ हजार रुपयांचा ऐवज घेतला, परंतु बिल न भरताच त्यांनी दुकानातून पोबारा केला होता.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत असताना अंमलदार विशाल काठे, प्रशांत मरकड यांना संशयितांची खबर मिळाली होती. तसेच, पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला होता.

संशयितांची खबर मिळताच युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना खबर दिली. त्यानुसार, सापळा रचून शनिवारी (ता. १५) संशयित सय्यद यास अटक करण्यात आली. गुन्ह्याची कबुली देतानाच त्याच्यकडून चोरीचे १७ हजार ७०० रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले. तसेच त्याचा साथीदार चापा काळे यास कॅनलरोड परिसरातील शिताफीने अटक करण्यात आली.

दोघा संशयितांना जेरबंद करून अधिक तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयितांच्या तपासातून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, नाइक विशाल देवरे, समाधान पवार आदींच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT