Two-wheeler vandalised by miscreants at night in Hariom Nagar on Peth Road. In the second photograph, the broken glass of the rickshaw. esakal
नाशिक

Nashik Crime News : पेठ रोडवर समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पेठ रोडवरील दत्त नगर कॅनॉलच्या पलीकडे असलेल्या हरिओम नगरमध्ये मंगळवारी (ता.२१) पहाटे सुमारास उगले सदनाच्या आवार परिसरात उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकी व एका रिक्षाची काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vehicles vandalized by miscreants on Peth Road)

याबाबत अधिक माहिती अशी, की पंचवटीतील पेठ रोडवरील दत्त नगर कॅनॉलच्या पलीकडे हरिओम नगर आहे. या ठिकाणी माजी स्वीकृत नगरसेवक उत्तमराव उगले त्यांच्या कुटुंबासमवेत उगले सदन येथे राहतात. त्यांच्या सदन परिसराजवळच काही भाडेकरूही वास्तव्यास आहेत. या पैकी काही नोकरी तर काहीजण व्यवसाय करतात.

नित्य नियम दिनक्रम पार पाडून उत्तमराव उगले व येथील रहिवाशांनी रात्रीच्या सुमारास घराच्या आवारात भाडेकरूंची एक रिक्षा व चार दुचाकी उभ्या केल्या होत्या. मंगळवारी (ता.२१) पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून पेठ रोड मार्गे सात-आठ समाजकंटक हातात दांडके घेऊन आले.

वाहनातून उतरून त्यांनी रात्रीच्या अंधारात उगले सदनाच्या आवारात उभ्या असलेल्या उत्तमराव उगले यांच्या वाहनासह मनोज चंदनशीव, सागर चंदनशीव आणि मोरे यांच्या चार दुचाकींची, तसेच रिक्षांची तोडफोड केली. तोडफोड करून जाताना जवळच्या घरातून एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा जागा झाला. त्यांनी समाजकंटक आल्याने आरडाओरडा केला.

मात्र त्याच वेळी अंधाराचा फायदा घेत ते सर्व समाजकंटक शिवीगाळ करीत वाहनात बसून फरार झाले. त्यानंतर सकाळी ही घटना कळल्यावर उत्तमराव उगले यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

"नजीकच्या झोपडपट्टीतील काही समाजकंटक यांनी या वाहनाची तोडफोड केल्याचा संशय आहे. घडलेल्या प्रकरणाला सध्याच्या राजकीय वातावरणाचा तथा निवडणुकीचा रंग देण्याचा त्यांचा हा डाव असून या प्रकरणात काही पुढाऱ्यांचाही हात असल्याची दाट शक्यता वाटते. परंतु ही प्रवृत्ती फार विघातक असून या प्रवृत्तीला पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. यापुढे असे विघातक कृत्य करण्यास धजावणार नाहीत, असे कडक शासन करावे." -उत्तमराव उगले, माजी स्वीकृत नगरसेवक तथा पदाधिकारी, भाजप.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्र सरकारने दिली दिवाळी भेट! महागाई भत्ता वाढवून सरकारी कर्मचाऱ्यांना केले खूश; किती वाढणार पगार?

Hall Of Fame: ICC कडून मोठी घोषणा! डिविलियर्स, कूकसह एका भारतीय खेळाडूचाही होणार सन्मान

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

Latest Maharashtra News Updates : SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची इस्लामाबादमध्ये बैठक संपन्न

Hema Malini : मुंबईतील त्या बंगल्यात राहायला जाताच हेमामालिनी यांना आलेला विचित्र अनुभव ; ताबडतोब सोडलेलं राहतं घर

SCROLL FOR NEXT