नाशिक : तामसवाडीत (ता. निफाड) अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असून, संशयिताने मेव्हुण्यावरही कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर जखमी पत्नी व मेव्हुण्याला संशयितच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला असता, सिव्हिल पोलीस चौकीतील पोलीसांच्या चाणाक्षतेमुळे संशयिताने रचलेला अपघाताचा बनाव उघडकीस आला. मात्र, जखमी मेव्हुण्याच्या फिर्यादीनुसार पती-पत्नीच्या वादातून खून झाल्याचे म्हटले आहे. (Nashik Crime Wife killed immoral relationship Tamaswadi marathi news)
मनोज रमेश पोतदार (३३, रा. तामसवाडी, ता. निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. वर्षा मनोज पोतदार (२९) असे मयत विवाहितेचे नाव असून, लाला बाळू शेवरे(३० रा. तामसवाडी) हा गंभीर जखमी आहे.
जखमी लाला शेवरे याच्या फिर्यादीनुसार, संशयित मनोज यास दारुचे व्यसन आहे. त्यावरून त्याची व पत्नी वर्षा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. बुधवारी (ता. १३) दुपारीही त्यांच्या वाद झाले असता, त्यावेळी संतापामध्ये संशयित मनोज याने कोयत्याने पत्नी वर्षावर वार केले.
यात ती गंभीररित्या जखमी झाले. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या मेव्हुणा शेवरे याच्यावरही संशयिताने कोयत्याने वार केले. त्यानंतर संशयितानेच दोघा जखमींना चांदोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांच्या प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
याठिकाणी उपचारादरम्यान मध्यरात्री वर्षाचा हिचा मृत्यु झाला. याप्रकरणी संशयित मनोज याच्याविरोधात खुनासह प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. पी. ढोकरे, हवालदार ए.ए. नाईक हे करीत आहेत. (latest marathi news)
खून अनैतिक संबंधातूनच
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मनोज बुधवारी रात्री त्याची पत्नी व मेव्हुण्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला. त्यानंतर तो केसपेपर (एमएलसी) करण्यासाठी सिव्हिल पोलीस चौकीत आला असता, त्याने पत्नी पाणी भरण्यासाठी गेली असता, पडल्याने त्यात तिला दुखापत झाल्याचे सांगितले.
तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्षाला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर संशयित मनोज पुन्हा मेव्हुण्याची केसपेपर घेऊन पोलीस चौकीत आला असता, तो कसा जखमी झाला याची चौकशी केला तेव्हा त्याला काही सांगता येत नव्हते. अखेर पोलिसांनी दोघांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर संशयित मनोजला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीसह मेव्हुण्यावर कोयत्याने वार केल्याची कबुली दिली. संशयिताने दोघांना अश्लिल अवस्थेमध्ये पाहिले. त्यानंतर त्याने कोयत्याने पत्नीवर हल्ला चढविला. त्यावेळी ती पळत असताना पडली आणि तिच्या डोक्याला दगडाचाही मार लागला.
तर मेव्हुण्यावरही संशयिताने कोयत्याने वार केले. पोलिसांनी सदरची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांना दिली. संशयितांने त्यांच्यासमोरही गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सायखेडा पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली.
शवविच्छेदनाचा अहवाल
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव मोठ्याप्रमाणात झाल्याने विवाहिता वर्षा हिचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने फॉरेन्सीक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.