Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्‍पवयीन मुलीसह, महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आधी अल्‍पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्‍या तिच्‍या आईचाही संशयितांनी विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल भागात घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयित यांना अटक करण्यात आली. (Crime Woman molested with minor girl)

गुरुवारी (ता.६) रात्री साडेनऊला चौघा टवाळखोरांनी थेट कुटुंबातील सदस्‍यांसमोर महिलेचा विनयभंग केल्‍याचे समोर आले आहे. तेरा वर्षीय अल्‍पवयीन मुलगी गुरुवारी (ता.६) राहत्या इमारतीच्‍या जिन्‍याने पहिल्‍या मजल्यावर जात असताना शेजारी राहाणाऱ्या शेर खान याने पाठीमागून येत तोंड दाबताना मुलीचे कपडे फाडले.

घडलेल्‍या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी मुलीची आई, वडील, आजी, आजोबा हे घराबाहेर आले. त्यानंतर पडितेच्या आईने मुलीची छेड का केली? असा सवाल केला असता, त्‍याचा राग येऊन संशयित शेर खानसह त्‍याचे नातेवाईक आवेद खान. (latest marathi news)

इजारुल खान, फारुख मलिक या संशयितांनी संबंधित महिलेचे कपडे फाडून, लोखंडी सळई, लाकडी फावडे, दांडक्‍याने सर्व कुटुंबीयांना मारहाण केली. इतक्‍यावरच न थांबता घडलेल्‍या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्‍यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यानंतर पीडित व तिच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर शिताफीतीने कारवाई करताना पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. तर त्‍याच्‍या दोघा साथीदारांचा देखील पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT