Nashik esakal
नाशिक

Nashik News : प्रथमोपचार प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे निकष नव्याने निश्चित; कामगारांना वेळेत प्रशिक्षणाची तरतूद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कारखाना अधिनियमातील तरतुदीनुसार प्रथमोपचार प्रशिक्षण संस्थांच्या मान्यता व नूतनीकरणाचे निकष नव्याने निश्चित करण्यात आले आहेत. कंपनीत कामगार अथवा कर्मचारी कार्यरत असताना वैद्यकीय आपत्तीकालीन परिस्थिती उद्‍भवल्यास प्रथमोपचारासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. जेणेकरून दवाखान्यात येईपर्यंत किमान रुग्णास योग्य प्रथमोपचार दिला जाईल. (criteria for institutions providing first aid training has been newly determined )

कारखाना अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार राज्यातील विविध कारखान्यांतील कामगारांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांना मान्यता दिल्या जातात. या संस्थांना मान्यता व नूतनीकरणाचे निकष २०१२ मध्ये ठरविण्यात आले होते. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यासाठी संचालक, सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने त्यांच्या स्तरावर समिती स्थापन करून शासनाला मे २०२४ मध्ये अहवाल सादर केला होता. त्यानुसार प्रशिक्षण संस्था मान्यता देण्यासाठी निकष नव्याने लागू करण्यात आले आहेत. (latest marathi news)

नव्याने लागू केलेले निकष

- धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी

- संस्थेकडे किमान एमबीबीएस पदवी प्राप्त, नोंदणीकृत असलेला किमान एक तरी प्रशिक्षक असावा

- प्रशिक्षणाचा कमीत कमी पाच वर्षे अनुभव, प्रशिक्षकाचे वय ६५ पेक्षा अधिक असू नये

- कमीत कमी ३० प्रशिक्षणार्थी बसू शकतील इतकी स्वतःच्या कार्यालयाची जागा असावी

- प्रशिक्षणाचा तपशील त्याचवेळी मोबाईल ॲप्लिकेशन किंवा ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक

- प्रथमोपचारासाठी ओव्हरहेड प्रोजेक्टर साउंड सिस्टिमसह सर्व मशिनरी संस्थेकडे आवश्यक

- प्रथमोपचार संस्थेच्या मान्यतेचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे

- संस्थेच्या नोंदणीसाठी शुल्क २० हजार व नूतनीकरणासाठी दहा हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT