Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
नाशिक

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा 'एन्काउंटर' जनता करेल; खासदार संजय राऊत यांची माध्यमांशी बोलताना टीका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बदलापूर घटनेतील आरोपीने दिलेल्या जाबजबात काही खुलासे केले होते म्हणून शिंदेचे एन्काउंटर झाल्याचा आरोप करताना या प्रकरणात कोणाला तरी वाचविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत.

आता एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला. एका शिंदेचा एन्काउंटर झाला असला तरी दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, या शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Criticism of MP Sanjay Raut on Eknath Shinde)

ग्रामीण भागातील कार्यक्रमासाठी खासदार राऊत नाशिकमध्ये आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटरचे प्रकरण शंका घ्यावे, असे आहे. मुंबई किंवा इतरत्र कुठेही एन्काउंटर झाले तर ते खरे नसते, यात काहीतरी रहस्य असते.

काहीतरी संपवायचे असते. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणात मोठे मासे वाचविण्यासाठी एन्काउंटर घडविले गेले. बदलापूर प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत. ज्यांना कोणाला वाचवायचे आहे ते भाजपशी संबंधित व संस्थाचालक आहेत.

या प्रकरणात घटना घडली त्या वेळी बदलापूर येथील जनता आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणून रस्त्यावर उतरली, संतप्त नागरिकांनी रेल्वेसेवा बंद पाडली, रस्ते बंद केले, मंत्र्यांना परत पाठविले. आरोपीला आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा शिक्षा देऊ, अशी मागणी होती.

तेव्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी महाराष्ट्रात कायदेशीर राज्य आहे. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवू, असे आश्वासन दिले होते. स्वच्छतागृह साफ करणाऱ्या मुलाला गोळ्या चालवायचे ट्रेनिंग कोणी दिले? शाळेचे संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पॉस्कोंतर्गत गुन्हा का दाखल केला, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला. (latest marathi news)

एन्काउंटरची गरज का पडली?

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण केले आहे त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी एन्काउंटर केले आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित करताना प्रकरण साधे नसल्याचे सांगितले. फास्ट ट्रॅकवर खटला चालविला जाणार असताना व त्याला फाशी देणार असल्याचे सांगितले असताना तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडली याचे उत्तर सरकारकडून अपेक्षित आहे.

कोणीही पळून जात नव्हते, पोलिस व्हॅनमध्ये बेडीने जखडलेला व बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? पोलिस अधिकाऱ्याच्या कंबरेवरील पिस्तूल कसे काढले? पोलिस एवढे लेचेपेचे असतील तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे राऊत म्हणाले.

सरन्यायाधीशांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सरन्यायाधीश यांनी एका कार्यक्रमात चहा घेतला. अजित पवार यांच्याबाबत जी सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्यविनोदामध्ये रमत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशीही टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT