Cultivation of Rabi  esakal
नाशिक

Nashik Agriculture News : जिल्ह्यात रब्बीची सव्वादोन लाख हेक्टरवर लागवड; पावणेतीन लाख टन खतसाठा मंजूर

Agriculture News : जिल्ह्यात कृषी विभागाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असून, यंदा रब्बी हंगामासाठी सरासरी दोन लाख २५ हजार ५६० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कृषी विभागाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असून, यंदा रब्बी हंगामासाठी सरासरी दोन लाख २५ हजार ५६० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यंदा पुरेसा पाऊस झाला असून, धरणे ओवरफ्लो असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेते रब्बी क्षेत्र वाढले. दुसरीकडे, रब्बी हंगामासाठी दोन लाख ७५ हजार टन खतसाठा मंजूर झाला आहे. गतवर्षी दुष्काळामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र मॉन्सून वेळात दाखल झाला. ( Cultivation of Rabi on 152 lakh hectares in district )

जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच धरणे भरली आहेत. जिल्ह्यात खरिपाची ६.५० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन पिकाला मोठी पसंती दिली. कपाशी, तूर, मूग, उडिदाचे क्षेत्र वाढलेले दिसले. उडीद आणि मुगाची काढणी सुरू झाली. अनेक ठिकाणी बाजरीची सोंगणी सुरू आहे. कपाशीची पहिली वेचणीही सुरू झाली. दसऱ्यानंतर कपाशीचे मार्केट वाढणार आहे. आता कृषी विभागाने रब्बीचीही पूर्वतयारी सुरू केली आहे. (latest marathi news)

१ ऑक्टोबरनंतर खते, बियाण्यांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यंदा जिल्ह्यात साधारणतः कांदा पिकासह दोन लाख २५ हजार ५६० हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी एक लाख ४१ हजार ९८१ हेक्टरवर रब्बीची लागवड झाली होती. यात गव्हाची लागवड ४२ हजार १७६ हेक्टर झाली होती. त्यापाठोपाठ ज्वारी, मका व हरभरा लागवड झाली होती.

यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यासाठी कृषी विभागाने खतांची मागणी केली होती. जिल्ह्यासाठी दोन लाख ७५ हजार टन खतसाठ्यास मंजुरी मिळाली. याशिवाय, ३६ हजार २१५ क्विंटल, महाबीजमार्फत आठ हजार ६०३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT