Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime News : स्‍टॉक मार्केट ट्रेडिंगच्‍या बहाण्याने दोघांची 76 लाखांची फसवणूक

Crime News : स्‍टॉक ट्रेडिंगच्‍या नावाने फसवणुकीची अनेक प्रकरणे आत्तापर्यंत समोर आलेली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime News : स्‍टॉक ट्रेडिंगच्‍या नावाने फसवणुकीची अनेक प्रकरणे आत्तापर्यंत समोर आलेली आहेत. या फसवणुकीच्या रक्‍कमची इमले वाढतच चालले आहेत. स्‍टॉक ट्रेडिंगच्‍या नावाने नुकताच दोघांची तब्‍बल ७६ लाख १६ हजार ८०५ रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्‍यान वेळोवेळी फोनद्वारे व इंटरनेटच्‍या माध्यमातून हे पैसे भामट्यांनी उकळले. (Nashik Cyber ​​Crime 76 lakh fraud news)

याप्रकरणी राजेश धरमदास सचदेव (५४, रा. जुना गंगापूर नाका) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यांना व त्‍यांच्‍या सहकार्यास भामट्यांनी वेगवेगळ्या व्‍हॉटसॲपच्‍या माध्यमातून संपर्क साधला. व केकेआर प्रो या मोबाईल ॲपमध्ये इन्‍स्‍टिट्यूशनल अकाउंटच्‍या माध्यमातून स्‍टॉक मार्केटमध्ये पैसे लावण्याचे आमिष दाखविले.

ट्रेडिंगद्वारे जास्‍त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविताना डिसेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्‍यांमध्ये जैसे वर्ग करण्यास सांगितले. परंतु परतावा मिळत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर फिर्यादीदारांनी सायबर पोलिस ठाणे गाठताना फिर्याद दाखल केली आहे.   (latest marathi news)

ज्‍या क्रमांकावरून व्‍हॉटसॲपद्वारे संपर्क साधण्यात आला, त्‍या क्रमांकासह पैसे अदा केलेल्‍या बँक खातेधारकांविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान, शेअर ट्रेडिंगच्‍या नावाने आर्थिक फसवणुकीचे यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये रक्‍कम वाढतच चालली आहे. तर फसवणूक करणाऱ्या भामट्यांना गजाआड करण्याचे आव्‍हान सायबर पोलिसांपुढे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT