deepfake video ai technology crime internet social media Be careful Sakal
नाशिक

Nashik Cyber Crime: सावधान! सायबर गुन्हेगारांकडून AI चा होतोय गैरवापर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोशल मीडियावर अनेकदा फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. परंतु त्याच फोटो वा व्हिडिओचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर करण्यात येऊन त्यामुळे समाजात बदनामी वा गंडा घातला जाण्याचीही शक्यता आहे.

सायबर गुन्हेगारांकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) गैरवापर करून अगदी दुसऱ्याचा हुबेहूब आवाज व व्हिडिओ तयार केले जात असल्याने, इंटरनेट वा सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.

त्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे. (Nashik Cyber ​​Crime AI being misused by cybercriminals)

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा सायबर भामट्यांनी ‘डिपफेक’चा वापर करून व्हिडिओ व फोटो व्हायरल केले होते. त्याची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चाही झाली होती.

दरम्यान सदरील व्हिडिओ व फोटो बनावट असल्याचे, तसेच ते मॉर्फ करून केले असल्याचे समोर आल्याने सायबर गुन्हेगारी एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यापर्यंत पोचले आहे. त्यामुळे या सायबर गुन्हेगारीचा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सायबर भामटे डीपफेकचा वापर करून सोशल मीडियावरील एखाद्याचा फोटो, व्हिडिओचा वापर करून त्यातील व्यक्तीचे चेहरे बदलून अश्लील व्हिडिओ, फोटो तयार करणे, व्हिडिओ कॉल करून त्या व्यक्तीसारखाच आवाज काढले जातात.

तसेच असे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले जातात. त्यातून एखाद्याची बदनामी होऊन सार्वजनिक जीवनही उद्‌ध्वस्त होऊ शकते.

नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत असा स्वरूपाचा तक्रार वा गुन्हा अद्याप दाखल नसला तरी भविष्यात असे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांनी सतर्कता बाळगत इंटरनेट वापरकर्ते व सोशल मीडियावर वापरणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

असे ओळखा बनावट फोटो वा व्हिडिओ

डीपफेकच्या माध्यमातून बनविण्यात येणारे व्हिडिओ वा फोटो सहज ओळखता येऊ शकतात. यातील व्यक्तीला लावलेला चेहरा व इतर बाबींमध्ये जाणवण्याइतपत हालचाली लक्षात येतात.

जेवढा भाग मॉर्फ केलेला असतो, तोही बारकाईने पाहिल्यास ते बनावट असल्याचे लक्षात येते. डोळ्यांच्या व चेहऱ्याच्या हालचालींवरून व्हिडिओ फेक असल्याचा अंदाज येतो.

हे कराच..

* सोशल मीडियावर स्वतःचे वा कुटुंबीयांचे फोटो, व्हिडिओ शेअर करू नका

* सोशल मीडियावर आलेली अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका

* सोशल मीडियावरील अनोळखी लिंक ओपन न करता डिलीट करा

* फोटो, व्हिडिओ शेअर करताना सावधगिरी बाळगा

* सोशल मीडिया, इ-मेलचे पासवर्ड बदल करीत राहावा

* सायबर गुन्ह्यांबाबत https://cybercrime.gov.in यावर तत्काळ तक्रार नोंदवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT