nashik cyber fraud esakal
नाशिक

Nashik Cyber Fraud : स्टॉक ट्रेडिंगचे आमिष दाखवून तिघांना गंडा; सायबर भामट्यांकडून नाशिककरांची फसवणूक सुरूच

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Fraud : शेअर मार्केटमध्ये स्ट्रॉक ट्रेडिंगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक सायबर भामट्यांनी केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून सायबर भामट्यांकडून पाठविल्या जाणाऱ्या लिंक्स, चॅटिंगच्या माध्यमातून सावज हेरले जातात. अशा सापळ्यांपासून सावधगिरी बाळगण्यासह प्रलोभनांना बळी न पडण्याचे गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही नाशिककर सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. (Three cheated by showing lure of stock trading )

सायबर भामट्यांनी पुन्हा तिघांना अशारितीने सुमारे ७१ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या १५ मार्च रोजी संशयित सायबर भामट्याने त्यास शेअर मार्केट संदर्भातील लिंक शेअर केली होती. त्यानंतर संशयितांनी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधून त्यास शेअर मार्केटमध्ये स्टॉक ट्रेडिंग करण्यासंदर्भात सांगितले आणि त्यावर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिषही दाखविले.

त्यासंदर्भातील सायबर भामट्यांनी त्यास वेगवेगळ्या अकाऊंटवरील स्टॉक मार्केटमधून मिळत असलेल्या नफ्याची माहिती दिली. या सार्या बाबींना तक्रारदार युवक प्रभावित झाला आणि सायबर भामट्यांच्या जाळ्यात तो अडकला. त्यानुसार त्याने आर्थिक गुंतवणूक करण्यास सुरवात केली. आभासी अकाऊंटवर तक्रारदारास त्याच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे दिसत होते. तो परतावा पाहून तक्रारदाराने सायबर भामट्याकडे आणखी गुंतवणूक केली.

अशारितीने त्याने ५१ लाख ४६ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक १२ जूनपर्यंत केली होती. याच दरम्यान, शहरातील आणखी दोघे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले होते. त्यांच्याकडून संशयित भामट्यांनी त्याचरितीने आमिष दाखवून आणि त्यांनाही आभासी अकाऊंटवर होणारा नफा दाखवून त्यांच्याकडूनही याच काळात १९ लाख ४७ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक करून घेतली. परंतु तक्रारदारांनी जेव्हा त्यांच्या स्टॉक मार्केटच्या अकाऊंटवरील जादा परताव्याची रक्कम काढण्यासाठी प्रयत्न केले असता, ती रक्कम काढता येत नव्हती.

यासंदर्भात सायबर भामट्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर अनेक प्रयत्न करूनही ते पैसे मिळत नसल्याचे फसवणूक झाल्याचे तिघांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार अज्ञात सायबर भामट्यांविरोधीत आयटी ॲक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

''शहर गुन्हेशाखा आणि सायबर पोलिसांकडून सोशल मीडियांवर प्रलोभनांना बळी न पडण्यासंदर्भात जनजागृती केली जाते. परंतु असे असतानाही सुशिक्षितच सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत. सोशल मीडियावर दाखविली जाणारी प्रलोभने ही फसवणुकीसाठीच असतात. त्यामुळे कोणीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये.''- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT