Guardian Minister Dada Bhuse, Divisional Commissioner Dr. Praveen Gedam, Collector Jalaj Sharma etc. while interacting with Kikvi dam victims. esakal
नाशिक

Dada Bhuse News : ‘किकवी’ धरणाचा प्रश्‍न मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सोडवणार : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला भविष्यातील पर्याय म्हणून प्रस्तावित केलेल्या किकवी धरणाचा प्रश्‍न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. पंधरा वर्षांपासून किकवी धरणाचा प्रश्‍न प्रलंबित असून त्यातून नाशिक शहराला २१०० दलघफू पाणी मिळणार आहे. (Kikvi dam issue will be solved in cabinet meeting)

नाशिकची २०४१ मधील लोकसंख्या गृहित धरुन आवश्‍यक पाणीपुरवठा करण्यासाठी २००९ मध्ये किकवी धरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. ब्राह्मणवाडे (ता. त्र्यंबकेश्‍वर) परिसरात धरण उभारण्यासाठी २००८-०९ मध्ये २८३ कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. सद्यःस्थितीत ही किंमत १४०० कोटींवर पोचली आहे.

गंगापूर धरणाचे पाणी पुरेशे नसल्यामुळे किकवीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. याविषयी पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. १) संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते.

दिरंगाईमुळे २८३ कोटींचा प्रकल्प १४०० कोटींवर

किकवी धरणाची २४८५ दलघफू साठवण क्षमता असून ते सर्व पाणी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. या प्रकल्पास राज्य सरकारने २६ ऑगस्ट २००९ ला २८३ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर ४ डिसेंबर २०१२ ला पाटबंधारे विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक कार्यालयाकडून धरणाच्या आराखड्यास मंजुरीही दिली. (latest marathi news)

नाशिक महापालिका व जलसंपदा विभागात पाणी उपलब्धतेबाबत झालेल्या करारानुसार २०२१ पर्यंत किकवी धरणातून २१२० दलघफू पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, या धरणाबाबत मधल्या काळात काहीही प्रगती न झाल्यामुळे इतर धरणांमधील सिंचनाच्या पाण्यावर त्याचा बोजा पडत असून, नाशिककरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

वन विभागाला १७२ हेक्टर जागेपोटी ३६ कोटी रुपये वर्ग करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. किकवी नदीवर अडीच टीएमसी क्षमतेच्या धरणासाठी १४०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. भूसंपादनासाठी ६६२ कोटी, तर बांधकाम व इतर कामांसाठी ७३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

असा आहे किकवी प्रकल्प

ठिकाण : ब्राह्मणवाडे (ता. त्र्यंबक)

उपलब्ध पाणी : २४८५ दलघफू (पिण्यासाठी)

खोरे : गोदावरी

पाणलोट क्षेत्र : ७० चौ.किमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT