Pits lying on the bypass near Pimpri Phata. In the second photo, the devastation near Sinnar Chauphuli esakal
नाशिक

Nashik Damage Road: मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य! महामार्ग दुरुस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष

विजय पगारे

Nashik Damage Road : तालुक्यासह कसारा घाट परिसरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर खोल आणि रुंद खड्डे इगतपुरी ते नाशिकदरम्यानच्या ४५ किलोमीटरच्या अंतरात पडले आहेत.

त्यामुळे महामार्गाचे तीन-तेरा वाजवले आहेत. लहान-मोठ्या वाहनधारक व चालकांना त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. (Nashik Damage Road Empire of potholes on Mumbai Agra highway Department neglect of highway repair)

नाशिकहून मुंबईकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर पावसामुळे खोलगट खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी भरले आहे. सुसाट वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.

नाशिकहून निघताना महामार्गावर गरवारेपासून खड्ड्यांचा प्रारंभ होतो. त्यानंतर दहाव्या मैल येथे रस्त्यांवरवाहनांची गती आपोआप कमी होते. वाडीवऱ्हे गावाच्या हद्दीतून महामार्ग पुढे विस्तीर्ण होतो.

तेव्हा मोठ्या खड्यांनी रस्त्याचे अस्तर विस्कटून गेल्याचे चित्र वाहनचालकांना सावध करणारे ठरते. गोंदे परिसरात तीन ते चार मोठे खड्डे आहेत.

तेथे वाहनचालकांना अंदाज आला नाही तर अपघात हमखास होतो. नागरिकांनीही येथील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महामार्ग देखभाल, दुरुस्ती विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

खड्डेच झाले गतिरोधक

वाडीवऱ्हे गावात महामार्गावरील चौफुलीवरून शिरण्यासाठी गतिरोधक बसविले आहेत. मात्र, खड्डे वाहनांना ब्रेक लावण्यास पूरक ठरले आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांना येथे स्पीड बेक्रर असल्याचे फलक वाचण्याची गरत पडत नाही.

कारण दोन्ही लेनमध्ये सुमारे १० ते १२ खड्डे एकाच ठिकाणी असल्याने वाहनचालकांना ते चुकविण्याची संधी मिळत नाही. खड्डे गतिरोधकाचे काम करीत असल्याची खोचक प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.

चौफुली, गतिरोधक आणि सर्व्हिस रोड एकाच ठिकाणी मिलाफ होणारी वाडीवऱ्हेतील ही जागा अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वळणावरच खड्डे

घोटीतून सिन्नरकडे जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांची संख्या मोठी आहे. सिन्नर चौफुलीवर खड्ड्यांचे प्रमाण मोठे असल्याने त्यात पाणी भरून त्याला डबक्याचे स्वरुप आले आहे.

मात्र, टोलनाक्यापासून पुढे इगतपुरी परिसरात आणि घाट सुरू होण्याअगोदर खड्डे, उखडलेले डांबर आणि पावसाच्या पाण्याने वाहून गेलेले अस्तरामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की गावांना जोडणारा रस्ता आहे, असा प्रश्न बाहेरून आलेल्या नागरिकांना पडत आहे.

कसारा घाटात आणि घाटाच्या शेवटी लतीफवाडी ते कसारा गावाच्या टी-पॉईंटपर्यंत अवघड वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. नेहमी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रात्रंदिवस त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक ते इगतपुरीदरम्यान ४५ किलोमीटरच्या महामार्गावर नाशिकहूनच सुरवात होते ती गरवारे पॉंईटपासून. पुढे विल्होळी, दहावा मैल, वाडीवऱ्हे, गोंदे, मुंढेगाव,सिन्नर चौफुली, पिंपरी फाटा ते पुढे लतीफवाडी व खर्डीपर्यंत खड्ड्यांचे डेस्टिनेशन तयार झाले आहेत.

"नेहमीच येतो पावसाळा आणि महामार्गावर होतो रंकाळा, अशी उक्ती वापरली तरी वावगे ठरणार नाही. महिनाभरापासून महामार्गावर खड्ड्यांचा सामना करीत आहे. याबाबत महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने लक्ष घालावे, एवढीच माफक अपेक्षा आहे."

-राजाराम पवार व गोकुळ पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT