Gravel dumped in road pit near Ram temple. In the second silhouette, pits lying near the railway station. esakal
नाशिक

Nashik Damage Road: खड्ड्यांमुळे 3 दिवसांत अनेक अपघात; दुचाकीसह वाहनांचे नुकसान, चालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Damage Road : जुना मुंबई-आग्रा महामार्ग रस्ता गेल्या पाच वर्षांपासून खड्डेमय आहे. काही महिन्यांपुर्वी उपोषण व गाव बंदमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने थोडीफार डांबराची मलमपट्टी केली.

मात्र, संततधारेमुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. मंगळवारी (ता. १९) गणरायाच्या आगमनासाठी रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकल्याने तीन दिवसांत अनेक अपघात झाले. (Nashik Damage Road Several accidents in 3 days due to potholes Damage to vehicles including two wheelers driver injured nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खड्डे पडले असून, खड्डे वाचविण्याच्या नादात छोटे अपघात होत आहे. गणेशमूर्ती घेऊन जाताना अनेक भाविकांच्या दुचाकी घसरून जखमी झाले व वाहनांचे नुकसान झाले.

गणरायाचे घरापर्यंत नेताना खडतर प्रवास करावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होतात. पावसाचे साचलेल्या पाण्यामुळे खड्डे किती खोल आहेत, याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वार पडून जखमी झाले.

रात्री रस्त्यावर लाईट नसल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील रेल्वेस्थानक, देना बॅंक, बुद्धविहार, टिकापुरी, बसस्थानक, हॉटेल शिवमसमोर, शिवसेना कार्यालय, भाजी मार्केट रोड, राममंदिर, तीन लकडी पूल, तळेगाव रोडवर सुमारे अर्धा फुट ते एक फुटापर्यंत खड्डे झाल्याने सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहे.

"इगतपुरी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे माझ्या मुलाच्या मनक्यात गॅप पडला आहे. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या रस्त्याची डागडुजीसाठी कोणीही पुढाकार घेत नाही." -हौसाबाई तेलोरे, रहिवासी

"नवीन दुचाकी घेतली होती. खड्ड्यांमुळे गाडी आदळल्याने दुचाकीचे दोन्ही शॉकप्स खराब झाले आहेत. त्याची नुकसानभरपाई सार्वजनिक बांधकाम विभाग देणार का?"

-लोकेश खातळे, वाहनधारक

"पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा गाडीचे टायर फुटले आहे. शहरातील तीन किलोमीटर अंतरापर्यंत खड्डेच खड्डे झाल्याने वाहनांचे नुकसान होतेच, पण चालकांसही आजाराला निमत्रंण मिळत आहे. हा रस्ता नेमका कोणाच्या ताब्यात आहे, हेच कळत नाही."

-रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT