सोयगाव : सोयगावातील टेहरे चौफुली ते चर्चगेट हा मुख्य रस्ता जड वाहतुकीमुळे जीवघेणा झाला असून, रबरी गतिरोधक टाकले मात्र महिन्याभरातच ते उखडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्यावर मोठा अपघात झाला.
शालेय विद्यार्थ्यांची या रस्त्याने मोठी वर्दळ असते. त्यात भरधाव वेगाने येणारे वाहनांमुळे छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे.
या रस्त्यावर कायमस्वरुपी गतिरोधक टाकण्याची गरज असून संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Nashik Damage Road Tehre Chauphuli Churchgate road becoming fatal Heavy traffic increased number of accidents)
वर्षभरापूर्वीच हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनलेला आहे. सोयगावातील हा मुख्य रस्ता असून, गावातील उपरस्ते मुख्य रस्त्याला काटकोनात जोडले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
वारंवार मागणी केल्यानंतर या रस्त्यावर रंबल स्ट्रीप अर्थात रबरी स्पीडब्रेकर बसवले, मात्र ते तात्पुरत्या स्वरूपातच टिकले. अवजड वाहनांमुळे महिन्याभरातच ते उखडले गेले आहेत.
रस्ता बनवताना त्याचा दर्जा व नागरी सुरक्षितता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. शहरात दर्जेदार रस्ते बनत असले तरी नागरी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील नागरिक वारंवार स्पीडब्रेकरची मागणी करीत आहेत.
या रस्त्याने कांद्याचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने जातात. वेगावर नियंत्रण नसते. सोयगाव मराठी शाळेजवळ या मार्गामुळे सर्वात जास्त अपघात होत आहेत. यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून, गंभीर दुखापती झाल्या आहेत.
हा रस्ता चोवीस तास रहदारी असलेला आहे. अवजड वाहने देखील सुसाट वेगाने जातात. त्यामुळे दुचाकीस्वार, सायकल चालवणारे लहान बालके यांना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गतिरोधक टाकावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
"टेहरे चौफुली ते चर्च गेट रस्ता झाला, मात्र गतिरोधक नसल्याने आमच्या पाल्याना जीव मुठीत धरून जावे लागते. डी. के चौक हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे. प्रशासनाने रबरी गतिरोधक बसवले, मात्र ते पुरते निघून गेले आहेत. आमचे पाल्य घरी येईपर्यंत आमचा जीवात जीव नसतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गतिरोधक बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू."
- भूषण बच्छाव, नागरिक
"या रस्त्यावर रोज छोटेमोठे अपघात घडत आहेत. सोयगावातील हा मुख्य रस्ता असून, गावातील उपरस्ते या रस्त्याला जोडले आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी."
- संदीप बोरसे, नागरिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.