Darkness on the road near Dutt Mandir in Trimurti Chowk even when the street lamp is on. esakal
नाशिक

Nashik News : सिडको परिसरात पथदीपांखालीच अंधार! दृश्यमानता कमी; एलईडी दिवे बदलण्याची मागणी

Latest Nashik News : पूर्वी पथदीपांवर पिवळ्या प्रकाशाचे दिवे होते. परंतु ते काढून आता पांढऱ्या रंगाचे एलईडी लावले. मात्र हे बल्ब आता कमी दृश्यमानता असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत असल्याने चालणे मुश्कील होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिडको परिसरात महापालिकेकडून लावण्यात आलेल्या पथदीपांखालीच अंधार दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्रिमूर्ती चौक, दत्त चौक, सावतानगर, पवननगर, उत्तमनगर, प्रसादनगर, महाजननगर, जयहिंद कॉलनी, उपेंद्रनगर या ठिकाणी महापालिकेकडून पथदिपावरील एलईडी बल्ब मागील काही वर्षांमध्ये बदलण्यात आले.

पूर्वी पथदीपांवर पिवळ्या प्रकाशाचे दिवे होते. परंतु ते काढून आता पांढऱ्या रंगाचे एलईडी लावले. मात्र हे बल्ब आता कमी दृश्यमानता असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत असल्याने चालणे मुश्कील होत आहे. (Darkness under street lights in CIDCO area)

रात्री अनेक पथदीप चालू असतानाही खाली अंधारच दिसून येतो. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात परिसरात गैरसोय होत असल्या चित्र दिसून येत आहे. काही भागांमध्ये या रस्त्यातील पथदीप यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर सोडल्याने अंधाराचे साम्राज्य दिसून येते. काही ठिकाणी उजेड असून थोड्याच अंतरावर अंधाराचे चित्र दिसून येते.

त्यामुळे एक सलग या पथदीपांची निर्मिती करून या भागामध्ये पथदीप वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. अनेक ठिकाणचे पथदीप बंद आहेत. त्यांची दुरुस्ती करून ते तत्काळ चालू करून गैरसोय टाळण्याची मागणी सिडको परिसरातील नागरिक करत आहेत. अनेक भागांमध्ये सकाळी पथदीप दुरुस्तीच्या अनुषंगाने चालू असलेले दिसतात. परंतु रात्री पथदीप चालू करण्याचे कर्मचाऱ्यांना विसर पडतो की काय, असे चित्र दिसून येत आहे. (latest marathi news)

"पांढऱ्या एलईडीमुळे रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडत नाही. त्यामुळे पथदीप चालू असतानाही रस्त्यावर कायम अंधार दिसतो. त्यामुळे कधीकधी समोरून येणारी व्यक्ती सुद्धा कोण हे ही समजणे अवघड होत असते."- गणेश चव्हाण, नागरिक

"अनेक सखल भागांमध्ये रात्री पायी फिरत असताना मोठ्या प्रमाणात अंधार असतो. यामध्ये महिलांना असुरक्षितपणे रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रतीचे एलईडी लावण्याची गरज आहे."- सुषमा चवरे, महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT