Nashik Dam esakal
नाशिक

Nashik Dam : दारणा, भावली, नांदूरमध्यमेश्वर धरणे तुडुंब! धरणांतून विसर्ग सुरू

Nashik Dam : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तीन धरणे तुडुंब भरली असून, यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dam : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तीन धरणे तुडुंब भरली असून, यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग झाला आहे. दारणा धरणातून दुपारी तीनला सुरू झालेला पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्याने वाढवून सायंकाळी सातला तीन हजार ७४६ क्यूसेस इतका करण्यात आला; तर नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून दोन हजार ४२१ क्यूसेस वेगाने ‘जायकवाडी’च्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. (Darna Bhavali and Nandur Madhyameshwar Dams are being overflow )

इगतपुरी तालुक्यातील भावली हे धरण बुधवारी (ता. २४) दुपारी साडेचारला ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यात २४ तासांमध्ये १००.३ मिलिमीटर, तर सुरगाण्यात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २१, तर शहरात १५.३ मिलिमीटर पाऊस झाला.

पावसामुळे धरणांमधील साठा वाढला असून, काही धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावणेदोन महिन्यात अनेक तालुक्यांमध्ये सरासरीहून खूपच कमी पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे सर्वच जण पावसाची वाट पाहत होते. तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यावर कृपा केली असून, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांत पाऊस अधिक आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग तीन दिवस १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

सुरगाण्यात ६३, इगतपुरीत ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २१, तर शहरात १५.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत जुलैमधील सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या येवल्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला. दिंडोरीत १४१, चांदवडमध्ये १२०, नांदगावात ११०, तर त्र्यंबकेश्वरमध्ये १०९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जुलैत १७४.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असून, आतापर्यंत ७७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (latest marathi news)

तालुकानिहाय पाऊस स्थिती

तालुका पाऊस (मिलिमीटर)

त्र्यंबकेश्वर १००.३

सुरगाणा ६३.१

इगतपुरी ४९.०

पेठ ४४.३

दिंडोरी ३१.७

बागलाण २०.५

कळवण १९.०

चांदवड १४.८

नाशिक ११.२

देवळा ९.७

सिन्नर ७.४

निफाड ५.९

मालेगाव ४.८

नांदगाव ३.४

येवला ३.२

सरासरी २१.०

हंगामातील पहिला विसर्ग

भावली धरण १०० टक्के भरल्याने ते ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास धरणातील पाणी बाहेर पडत असल्याचे फोटो व व्हिडिओ प्रशासनातर्फे जारी करण्यात आले. दारणा धरणातील साठ्यात मोठी वाढ झाल्याने दुपारी तीनला एक हजार ८७४ क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी सहाला तो वाढवून दोन हजार ४९८ क्यूसेस, तर सातला तीन हजार ७४६ क्यूसेस वेगाने करण्यात आला.

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरवातीला ८०७ क्यूसेसने विसर्ग सुरू होता. सायंकाळी तो वाढवून दोन हजार ४२१ क्यूसेस करण्यात आला. यामुळे मराठवाड्यालाही दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणातील साठा ४३ टक्क्यांवर, तर ‘दारणा’तील साठा ७५ टक्क्यांच्या पुढे सरकला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT