नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ११ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. (Nashik BBA BCA CET Registration marathi news)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षांचे नियोजन आखले जात असते. गेल्या काही वर्षांपासून संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षा एक किंवा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेतल्या जात असतात. गेल्या वर्षी बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाचा समावेश करताना राज्यस्तरावरील सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले होते.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आणखी एका सीईटी परीक्षेची भर पडणार आहे. इयत्ता बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. (latest marathi news)
या चार अभ्यासक्रमांसाठी संयुक्त सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असून, ११ एप्रिलपर्यंत इच्छुक व पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
मे अखेरीस परीक्षा
नव्याने सुरु झालेल्या या सीईटी परीक्षेसाठी आधारित अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप याबाबतची माहिती संकेतस्थळावरील माहितीपत्रकात उपलब्ध करून दिलेली आहे. या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.