MHT-CET Exam  esakal
नाशिक

MHT-CET Exam : एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची शुक्रवारपर्यंत मुदत

MHT-CET Exam : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्‍य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

MHT-CET Exam : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्‍य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (ता. ८)पर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर नोंदणी करता येणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, बॅचलर्स ऑफ प्‍लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान या शाखांतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. (nashik Deadline for MHT CET exam registration till Friday marathi news)

दर वर्षी या परीक्षेला राज्‍यभरातून सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) तसेच भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये १६ ते ४० एप्रिल या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेला बारावीतील विज्ञान शाखेतून प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना या परीक्षेला अर्ज करता येणार आहे. त्‍यानुसार शुक्रवार (ता. ८)पर्यंत ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्‍क भरता येणार आहे.

राज्‍याबाहेरही परीक्षा

संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही विविध सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षार्थींना त्‍यांचा परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख व वेळ विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशपत्रावर उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. ही परीक्षा राज्‍यभरात तसेच महाराष्ट्राच्‍या बाहेरील परीक्षा केंद्रातदेखील आयोजित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT