Pune University  esakal
नाशिक

Nashik News : स्‍वयंमूल्‍यांकन अहवालासाठी आता 10 जूनपर्यंत मुदतवाढ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्‍न महाविद्यालयांना स्‍वयंमूल्‍यांकन अहवाल (सेल्‍फ अप्रायझल रिपोर्ट) सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या होत्‍या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्‍न महाविद्यालयांना स्‍वयंमूल्‍यांकन अहवाल (सेल्‍फ अप्रायझल रिपोर्ट) सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या होत्‍या. हा अहवाल सादर करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत होती. परंतु अनेक महाविद्यालयांनी अद्याप अहवाल ऑनलाइन भरला नसून, काहींनी अहवालाची प्रत विद्यापीठास पाठविलेली नाही. (Deadline now extended till June 10 for Self Assessment Report)

त्‍यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांना मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार महाविद्यालयांनी १० जूनपर्यंत स्‍वयंमूल्‍यांकन अहवाल पुणे विद्यापीठास सादर करायचा आहे. अभियांत्रिकी, वास्‍तुशास्‍त्र, औषधनिर्माणशास्‍त्र, व्‍यवस्‍थापनशास्‍त्र, विधी, शिक्षणशास्‍त्र व शारीरिक शिक्षणशास्‍त्र आदी व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या महाविद्यालयांसाठी यापूर्वी सूचना जारी केली होती.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्‍या संलग्‍नता, मान्‍यता, नैसर्गिक वाढ सुरू ठेवण्याच्‍या किंवा नूतनीकरणाच्‍या मान्यतेसाठी स्‍वयंमूल्‍यमापन अहवालाद्वारे माहिती सादर करण्याबाबत स्‍पष्ट केले होते. स्‍वयंमूल्‍यमापन अहवालासोबत आवश्‍यक प्रमाणपत्र जोडून ही कागदपत्रे विद्यापीठ कार्यालयात सादर करण्यास सांगितले होते. (latest marathi news)

अधिस्‍वीकृती अभिकरणाच्‍या मानकांनुसार अधिस्वीकृती किंवा पुर्नअधिस्‍वीकृती मिळण्यासाठी पात्र महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्‍यांकन व अधिस्‍वीकृती परिषदेकडून किंवा राष्ट्रीय अधिस्‍वीकृती मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुचविले होते. मात्र, अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन स्‍वरूपात माहिती नोंदविलेली नाही.

तर काहींनी विद्यापीठास हे कागदपत्र सादर केलेले नाहीत. यापार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने स्‍वयंमूल्‍यमापन अहवाल सादर करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुढे कुठल्‍याही स्वरूपात मुदतवाढ दिली जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT