Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Down esakal
नाशिक

PM Crop Insurance Yojana : पीकविमा भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत

सकाळ वृत्तसेवा

PM Crop Insurance Yojana : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२४-२५ या वर्षात बीड पॅटर्न (८०:११०) या तत्त्वावर राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने खरिपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरीबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी केले आहे. ( Deadline till Monday for payment of PM crop insurance yojana )

या योजनेंतर्गत विमा कंपनीवर नुकसानभरपाईचे विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपर्यंत दायित्व राहणार असून, यापेक्षा नुकसानभरपाई विमा हप्त्याच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकूण २० टक्के रक्कम स्वत:कडे नफा म्हणून ठेवेल व उर्वरित रक्कम राज्य शासनास परत करेल. (latest marathi news)

या योजनेत खरीप हंगामातील भातशेती, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, खुरासणी, मूग, उडीद, तूर, मका, कांदा, कापूस या पिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. पीकविमा भरणे व अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच नजीकच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT