जुने नाशिक : परमेश्वराकडून मिळालेले जीवन कसेही असू दे, खचून न जाता संपूर्ण आयुष्याचा आनंद कसा घ्यावयाचा, याचा प्रत्यय श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळाने आणून दिला. ऐकता, बोलता येत नसतानाही त्यांनी भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या सांकेतिक भाषेचा अर्थात हातवाऱ्यांचा वापर करून मिरवणुकीचा आनंद घेतलाच शिवाय अन्य सहकाऱ्यांनाही व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत मिरवणुकीतील क्षणचित्रांची माहिती करून दिली. (deaf and dumb are robbed of joy of procession through video calls )
श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ गेल्या १२ वर्षांपासून गणेश विसर्जन पारंपरिक मिरवणुकीत सहभाग घेत आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडून बि.डी. भालेकर मैदान येथे दहा दिवस बाप्पाची स्थापना करून जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. पाचही ज्ञानेंद्रियांवर प्रभुत्व असणाऱ्यांना लाजवणारे नियोजन त्यांच्याकडून केले जाते. सर्वजण एकत्र येऊन दहा दिवस बाप्पाची सेवा करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणुकीचे नियोजनही अतिशय चोख पद्धतीने केले जाते.
स्वतःही मिरवणुकीचा आनंद घेतात आणि घरी असलेल्या आपल्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांना घरबसल्या मिरवणुकीचा आनंद अनुभव करून देतात. त्यासाठी त्यांचे माध्यम ठरते ते म्हणजे त्यांची हातवाऱ्यांची सांकेतिक भाषा आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंग. मंगळवारी (ता.१७) निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हे दिसून आले. मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर स्वतःच्या मंडळासह मिरवणुकीतील संपूर्ण मंडळांचे थेट प्रक्षेपण त्यांनी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना करून दिले. (latest marathi news)
त्यांच्या हातवाऱ्यांच्या सांकेतिक भाषेतून मिरवणुकीतील आनंद व्यक्त केला. प्रत्येक क्षणाची आणि क्षणचित्रांची माहिती आपल्या भाषेत करून दिली. स्मार्ट फोनवरून व्हाट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून हातवाऱ्यांच्या भाषेतून माहिती समजावून देताना मिरवणुकीत सहभागी अन्य बांधव त्यांच्याकडे पाहून स्तब्ध होऊन जात.
काहीवेळ थांबून ते कशा पद्धतीने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना माहिती देत आहेत, याचा अनुभव घेत होते. काहीजण तर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांचे हातवारे बंदिस्त करत होते. पोलिस कर्मचाऱ्यांसह आलेल्या भाविकांमध्ये मूकबधिर बांधव चर्चेचा विषय ठरत होते. तर दुसरीकडे त्यांनी मिळालेले जीवन कसेही असू दे, कुठलीही तक्रार न करता आनंदात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू या, जणू असा संदेश दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.