Nashik News : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला असला तरी पाणीदार तालुके असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये अपुरा पाऊस आहे. परिणामी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व मुकणे धरणातील उपलब्ध पाणीसाठा आटत आहे. त्यात निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गंगापूर धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदता येत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पाणी लिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (decision to lift water from Gangapur Dam)
शहराला गंगापूर दारणा तसेच मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. या तिन्ही धरणांमध्ये मागील वर्षात पुरेसा पाणीसाठा असला तरी अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सूचना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्या होत्या. त्याअनुषंगाने ८.६ टीएमसी पाणी सोडले गेले.
परिणामी नाशिक महापालिकेने मागणी केल्यानुसार ७०० दशलक्ष घनफूट पाणी कमी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे जवळपास १८ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण झाला आहे. गंगापूर धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने महापालिकेने जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा निर्णय घेतला.
चर खोदण्यासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली असतानाच १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. राज्य शासनाच्या सुकाणू समितीकडे विशेष परवानगी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्जदेखील करण्यात आला. (latest marathi news)
मात्र परवानगी मिळाली नाही, त्यात आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ५ जुलैपर्यंत आचारसंहिता कायम आहे. पावसाची अद्यापही ओढ असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. पुढील आठ दिवसात पाऊस न झाल्यास शहरात आठवड्यातून एक किंवा दोनदा पाणी कपातीचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने नियोजन केले आहे.
दोन सत्रात पाणी वितरण
गंगापूर धरणाच्या मध्यभागी जवळपास ६०० दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा आहे, ते पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदावी लागेल. मात्र सद्यःस्थितीत शक्य नसल्याने तेच पाणी लिफ्ट करून जॅकवेलपर्यंत आणण्याचा पर्याय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठेवला आहे. लिफ्ट केलेले पाणी जॅकवेलपर्यंत आणले जाईल तेथून दोन सत्रात पाणी उचलून ते वितरित करण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.