Green Chilli News esakal
नाशिक

Nashik Green Chilli News : हिरव्या मिरचीच्या आवकेत घट! दरात किंचित सुधारणा

Nashik News : नाशिक येथील बाजार समितीत १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान सप्ताहात हिरवी मिरचीची आवक १,१५२ क्विंटल झाली.

मुकुंद पिंगळे

Nashik Green Chilli News : येथील बाजार समितीत १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान सप्ताहात हिरवी मिरचीची आवक १,१५२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३ ते ४ हजार रुपये तर सरासरी दर ३, ५२५ रुपये मिळाला. त्यापूर्वीच्या सप्ताहात आवक १,८३१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,७०० ते ३,५०० रुपये तर सरासरी दर ३,२५० रुपये मिळाला. आवकेत घट झाल्याने क्विंटलमागे सध्या २७५ रुपयांची सुधारणा दिसून येत आहे. (Nashik Decline in arrival of green chillies marathi news)

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी- घेवड्याची आवक १०, ७६४ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १,२०० ते २,४०० असा तर सरासरी दर १ ,८०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ६०० ते २,५०० तर सरासरी दर १,४०० रुपये राहिला.

खरीप पोळ कांद्याची आवक ९,९९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३६५० ते २,१५० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ८,००१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,२०० ते १,८०० तर सरासरी दर १,७६० रुपये राहिला. लसणाची आवक ८८१ क्विंटल झाली.

त्यास प्रतिक्विंटल किमान ११,५०० ते कमाल २१,४०० तर सरासरी दर १७,००० रुपये राहिला. गाजराची आवक २,४२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,००० तर सरासरी दर १,७५२५ रुपये राहिला. फळभाज्यामध्ये टोमॅटोला ८० ते ३५० तर सरासरी २००, वांगी १०० ते २५० तर सरासरी १८०, फ्लॉवर १०० ते ३२५ सरासरी २२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १०० ते २२० तर सरासरी १७० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.

ढोबळी मिरचीला ३०० ते ५५० तर सरासरी दर ४७५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यात भोपळा १०० ते २२५ तर सरासरी १७०, गिलके २५० ते ३५० तर सरासरी ३००, कारले २०० ते ४५० तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. (Latest Marathi News)

फळांमध्ये केळीची आवक १,४४१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १, ८०० तर सरासरी दर १,४०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ६५५ क्विंटल झाली. मृदुला वाणास ३०० ते ८,००० तर सरासरी ५,००० रुपये दर मिळाला. द्राक्षाची आवक १४९ क्विंटल झाली. थॉमसन वाणास ९०० ते २,३०० तर सरासरी १,६०० रुपये दर मिळाला.

शरद सिडलेस वाणास १,६०० ते ४,००० तर सरासरी ३,२०० रुपये दर मिळाला.सोनाका वाणास १,५०० ते ३,८०० तर सरासरी ३,००० रुपये दर मिळाला. पपईची आवक ३०९ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ६०० ते १,३०० तर सरासरी दर ९०० रुपये मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

कोथिंबीर...७००...१,५००...२,०००

मेथी...५००...१,२००...९००

शेपू...५००...१,३००...८००

कांदापात...१,०००...२,५००...१,६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT