नाशिक : सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील दाखल गुन्ह्यात दीपक बडगुजरने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. शुक्रवारी (ता. ११) या अर्जावर निकाल देताना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तपासात पोलिसांना सहकार्य करण्याची व महिन्यातून दोनदा ठाण्यात हजेरी लावण्याची अट ठेवण्यात आली. सिडकोतील उत्तमनगर भागात १४ फेब्रुवारी २०२२ ला रात्री ॲड. जाधव यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी गोळीबार केला होता. (Deepak Badgujar granted pre arrest bail on condition of cooperation with police attendance at police station )
दोन वर्षे उलटल्यावर या गुन्ह्याची उकल झाली होती. गेल्या महिन्यात गुंडाविरोधी पथकाने आकाश सूर्यतळला या प्रकरणी अटक केल्यावर गुन्हा उघडकीस आला. मयूर बेद, श्रीकांत वाकोडे ऊर्फ बारक्या (रा. जेतवननगर), सनी पगारे, अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे यांना यापूर्वीच अटक केली आहे. संशयितांच्या चौकशीतून दीपक बडगुजर याचे नाव समोर आले. यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी (ता. १०) सुनावणी होऊन बचाव व सरकार पक्षातर्फे युक्तिवाद झाले.
न्यायालयाने शुक्रवारी निकाल देताना सशर्त जामीन मंजूर केला. पोलिसांना संपूर्ण सहकार्य करावे, तसेच महिन्यातून १६ व २९ तारखेला पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट ठेवली आहे. दरम्यान, जामिनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली. राजकीय हेतूने अडकविण्याचा प्रयत्न झाला असून, न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मोकां’तर्गत कारवाईची शक्यता?
बडगुजरला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला असला, तरी गुन्ह्यात ‘मोका’नुसार कारवाई प्रस्तावित आहे. संशयितांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे तपासातून समोर येत आहे. त्यामुळे ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला असून, या संदर्भात सोमवारी (ता. १४) निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.