निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : सीएनजी कारची मागणी सध्या वाढू लागली आहे. पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त, अधिक मायलेज व सीएनजी गॅस उपलब्धता ही प्रमुख कारणे विक्री वाढण्यामागे आहे. नाशिक आरटीओमधील नोंदणीनुसार २२-२३ या आर्थिक वर्षात ३६७३ व २३-२४ या आर्थिक वर्षात ४५४३ कारची नोंदणी झाली आहे.
दोन्ही आर्थिक वर्षाची तुलना केली असता आर्थिक वर्षात जवळपास मागील वर्षांपेक्षा २३ टक्क्याने अधिक मागणी वाढली आहे. गेल्या काही महिन्यात सीएनजी गॅस पूर्वीपेक्षा काही प्रमाणात सहज उपलब्ध होत आहे. तसेच सीएनजी पंपांची संख्याही वाढली आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीत सीएनजी कार मागणी अधिक वाढणार आहे. (Nashik Demand for CNG cars increased by 23 percent news)
सीएनजीच्या माध्यमातून अनेकांचे कारचे स्वप्न पूर्ण होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहे. त्यापेक्षा सीएनजी गॅस हा स्वस्त आहे. नाशिकमध्ये सीएनजी प्रतिकिलो ८८ रुपये आहे. मात्र मुंबई, पुणे या ठिकाणी नाशिक पेक्षाही सीएनजी गॅस स्वस्त आहे. सीएनजी गॅस उपलब्धतेत काही प्रमाणात का होईना सुरळीतपणा आला आहे.
पूर्वी सीएनजी कार खरेदीला प्रतिसाद मिळत नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅस उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात होती. तासनतास रांगेत ताटकळत गॅसची वाट बघावी लागत असे व सीएनजी पंपावरील गॅस कधी संपेल याचा अंदाजही येत नव्हता मात्र यामुळे सीएनजी कार खरेदीस प्रतिसाद मिळत नव्हता.
मात्र गॅस ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे व वाढलेल्या गॅस पंपांच्या संख्येमुळे सुरळीतपणा आला आहे. सीएनजी कार विक्रीत प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई व टाटा कंपन्यांचा दबदबा आहे. मारुतीमध्ये सीएनजी कारमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विक्रीचे प्रमाणही मारुतीचे अधिक आहे. (latest marathi news)
वाढीचे कारणे
*मायलेज अधिक : पेट्रोल आणि डिझेलपेक्षा अधिक मायलेज सीएनजी कार देते. प्रतिकिलोमीटर पेट्रोल व सीएनजी कार खर्चाचा विचार केला असता पेट्रोल कार अठरा किलोमीटर प्रतिलिटर मायलेज असल्यास ५.७० पैसे, तर सीएनजी पंचवीस किलोमीटर प्रतीकिलोग्रॅम मायलेज असल्यास ३.५० पैसे इतकी येते. आर्थिकदृष्ट्या सीएनजी कार परवडते.
* डिझेल मॉडेल इतकीच किंमत : पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी कार ही जवळपास अंदाजे साठ हजार रुपये किमतीने अधिक आहे, मात्र डिझेलच्या तुलनेत तिची किंमत कमी आहे. पेट्रोलवरील मॉडेल च्या तुलनेत डिझेलवरील मॉडेलची किंमत एक लाख रुपयांनी अधिक असते. मात्र, जे मॉडेल सीएनजीवर उपलब्ध होते, त्याची किंमत डिझेलपेक्षा थोडी कमीच आहे.
*बूट स्पेसमध्ये बदल : सीएनजी कारमध्ये डिकीमध्ये गॅस टाकी असल्यामुळे सामान ठेवण्यास जागा उपलब्ध होत नसे. त्यामुळे पूर्वी सीएनजी कारची मागणी कमी होती. मात्र काही कंपन्यांनी टाकीच्या रचनेमध्ये बदल केला. त्यामुळे जागा उपलब्ध झाली.
"सीएनजी गॅसमध्ये उपलब्धता, पेट्रोल व डिझेलपेक्षा प्रतिकिलोमीटर अधिक मायलेज मिळते. सीएनजी गॅस स्वस्त आहे, यामुळे मागणी वाढत आहे. येणाऱ्या कालावधीत मागणीचे प्रमाण जास्त असेल."- सोनल चौधरी, संचालक, रेडियंट हुंडाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.