Dengue Disease Expense esakal
नाशिक

Dengue Disease : डेंगीचा डंख लाखाला..! माहिती, उपाय, खबरदारी जाणून घ्या सर्वकाही

Latest Dengue Disease News : डेंगी रुग्ण घोषित झाल्यानंतर लाख, दीड लाखाला फटका बसल्याशिवाय राहत नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल तर विचारायलाच नको. वैद्यकीय विमा असेल तर सध्या अधिकच घाबरून देण्याचे उद्योग आहे.

सकाळ वृत्तसेवा

काही वर्षात डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वी डेंगी झालेला व्यक्ती सुखरूप घरी परतत होते. परंतु आता डेंगीचा डंख इतका भयानक झाला की रुग्ण घरी येईल की नाही, याची शाश्‍वती नाही. पाच वर्षाचा विचार केला तरी शहर व ग्रामिण भागात डेंगीची दहशत कशी माजली आहे, हे स्पष्ट होते.

डेंगी रुग्ण घोषित झाल्यानंतर लाख, दीड लाखाला फटका बसल्याशिवाय राहत नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल तर विचारायलाच नको. वैद्यकीय विमा असेल तर सध्या अधिकच घाबरून देण्याचे उद्योग आहे. लॅबसाठी डेंगीची चाचणी नवा धंदा बनला आहे. प्लेटलेटस कमी झाल्या म्हणजे डेंगी असे आता सर्वश्रृत होताना दिसत आहे.

प्लेटलेट कमी झाल्याने पांढऱ्या पेशींचा नवा धंदा उदयाला आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीपेक्षा रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता डेंगीला दूर ठेवण्याची उपाययोजना प्रत्येक नागरिकांच्या हाती आहे. धूर व औषध फवारणीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यापेक्षा परिसर व घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. (Dengue disease information)

सेंटीनेंटल लॅबचा अहवाल

संशयित डेंगी रुग्णांच्या रक्त नमुन्यांची चाचणी जिल्हा शासकीय रूग्णालयातील सेंटीनेटल लॅबकडे केली जाते. त्या लॅबच्या अहवालात डेंगी नमुद असेल तरच रुग्णांची नोंद होते. परंतु खासगी लॅबमधून तपासणी केली जाते. त्या अहवालावरून रुग्णावर उपचार होतात.

खासगी रुग्णालये फुल्ल

सेंटीनल लॅबच्या अहवालानंतर डेंगी रुग्णाची घोषणा होते. परंतु महापालिका किंवा ग्रामिण वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांची खरी आकडेवारी लपविली जात आहे. वास्तविक शहरात रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगीवर उपचार सुरू असल्याचे वास्तव आहे.

लोका सांगे ब्रम्हज्ञान..!

डेंगी उत्पत्ती स्थळासंदर्भात महापालिकेकडून नागरिकांना सूचना केल्या जातात. परंतु शासकीय कार्यालयांमध्येच दरवर्षी डेंगीच्या अळी आढळतात. महापालिकेकडून नोटीस बजावली जाते. विशेष करून जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, कृषी विभाग, पोलिस वसाहत, एसटी डेपो, विभागीय आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, टपाल कार्यालय, बीएसएनएल ऑफिस, जिल्हा परिषद, पंचवटी व नाशिक रोड पोलिस स्टेशन, आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह, वन विभाग या कार्यालयांमध्ये डास उत्पत्तीची साधने आढळतात. (latest marathi news)

सोमेश्‍वर परिसरात नदीकाठच्या भागातील खळग्यात साचलेले पाणी.

डेंगी म्हणजे काय?

- डेंगी हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंगी पसरविण्यास कारणीभूत असते. डेंगीला हाडं मोडून काढणारा ताप असेही म्हटलं जातं. या तापामुळे काही जणांचे हाडं आणि स्नायू दुखतात.

* निदान कसे होते?

निदान एनएस १, आयजीएम व आयजीजी रक्ताच्या या तीन चाचण्या करून होते

* प्रमुख लक्षणे?

- डेंगीच्या तापाचे दोन प्रकार आहेत. डेंगी फीव्हर डीएफ (Dengue Fever DF) व डेंगी हेमोर्याजिक फीव्हर (Dengue Hemorrhagic Fever DHF). पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणे दिसू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर ४ ते १० दिवसांत लक्षणे दिसू लागतात आणि २ ते ७ दिवसांपर्यंत असतात. दुसऱ्या प्रकारच्या तापासोबतच रक्तस्राव होतो. सुरवातीला ताप, अंगदुखी होते. शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी, लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागते व अशक्तपणा येतो.

उपचार काय?

- डेंगीवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. रुग्णाला विश्रांतीची गरज असते. भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. (दिवसाला अंदाजे ३ लिटर), साधा आहार. (latest marathi news)

विक्रेत्यांनी ढीग मांडून ठेवलेले जुनी टायर आणि रस्त्याच्या कडेला भंगारातील वाहने.

डेंगी डासांची उत्पत्ती कोठे होते?

- डेंगी पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. घरातील एसी, फ्रीजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, कुलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर.

आजारात महत्त्वाचे

- शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

- एक घन मिलिलिटर रक्तात १.५ लाख ते ४.५ लाख प्लेटलेट्स गरजेचे आहे.

- प्लेटलेट्स दहा हजारांच्या खाली गेल्यास बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात.

- डेंगी डास सामान्यतः दिवसा चावतात.

- डेंग्यू विषाणूचे १, २, ३, ४ असे चार प्रकार आहेत.

- एडिस इजिप्ती नावाची मादी चावते, नर डास चावत नाहीत.

- दूषित मादी निरोगी व्यक्तीला चावल्यास डेंगी होतो.

महापालिका हद्दीतील स्थिती

वर्ष संशयित दूषित मृत्यू

२०२० ११९१ ३३६ ०

२०२१ ५२८४ ११८४ ०

२०२२ २८७१ ६७७ ०

२०२३ ६२६६ १२९४ ०३

२०२४ ४९६३ ८७९ ०१ (ऑगस्ट)

ग्रामीण हद्दीतील स्थिती

वर्ष संशयित दूषित मृत्यू

२०२० ६२२ ६२ ०

२०२१ २७७८ २७७ ०

२०२२ १३३२ ५७ ०

२०२३ २३८४ २८४ १

२०२४ १६०२ १८१ २ (ऑगस्ट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT