nashik Dengue Update  esakal
नाशिक

Nashik Dengue Update : तपासणी किटअभावी 958 अहवाल प्रलंबित! डेंगी रुग्ण वाढण्याची भीती

Nashik News : जिल्हा रुग्णालयाकडे पाठविलेल्या डेंगी संशयितांचे अहवाल किट अभावी प्रलंबित होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. आत्तापर्यंत ९५८ अहवाल प्रलंबित आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा रुग्णालयाकडे पाठविलेल्या डेंगी संशयितांचे अहवाल किट अभावी प्रलंबित होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. आत्तापर्यंत ९५८ अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे एकाच वेळेस अहवालाची चाचणी झाली व त्यातून डेंगी बाधितांचा मोठा आकडा आल्यास महापालिकेची नाचक्की होण्याची भीती निर्माण झाली आहे. (Nashik Dengue Update)

शहरात डेंगी रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालयात ताजगी रुग्णालयाकडून डेंगीची खात्री करण्यासाठी तपासणी अहवाल पाठविले जातात. जिल्हा रुग्णालयातील लॅबच्या मार्फत रक्त तपासणी केली जाते. त्यानंतर डेंगी रुग्णावर शिक्कामोर्तब होते. रविवारपासून जिल्हा रुग्णालयाकडे टेस्टिंग किट उपलब्ध नसल्याची बाब समोर आली.

पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून की उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार किट उपलब्ध झाल्याचा दावादेखील करण्यात आला. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडे अद्यापपर्यंत किट उपलब्ध झालेले नाही. परिणामी अहवाल प्रलंबित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंत ९५८ अहवाल प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली. किट उपलब्ध झाले व एकाच वेळेस डेंगी बाधितांचा मोठा आकडा बाहेर पडल्यास महापालिकेची नाचक्की होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्याची घाई महापालिकेच्या मलेरिया व वैद्यकीय विभागाकडून थांबविण्यात आली आहे. (latest marathi news)

नमुने पाठविण्याची तयारी सुरू

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला किट प्राप्त झाले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून पुणे येथील संस्थेकडे कुरिअरच्या माध्यमातून तपासणीचे नमुने पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

पुणे येथील संस्थेकडे तपासणीसाठी अहवाल पाठविणे हा पर्याय नसला तरी नागरिकांचा वाढता रोष व महापालिका तसेच जिल्हा रुग्णालय या दोन संस्थांमध्ये निर्माण झालेला वाद यावर पर्याय म्हणून कुरिअरच्या माध्यमातून तपासणी किट पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT