Assembly Constituency  esakal
नाशिक

Nashik Deolali Assembly Constituency : चौरंगी लढतीमुळे मराठा मतांचे विभाजन

Assembly Constituency : मराठाबहुल मतदार असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा मतांचा टक्का वाढणे अपेक्षित होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Deolali Assembly Constituency : मराठाबहुल मतदार असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा मतांचा टक्का वाढणे अपेक्षित होते. मात्र मराठा समाजाच्या मतांमध्ये विभागणी होऊन त्याचा फटका गोडसे यांचा लीड कमी होण्यामागे झाला. त्या व्यतिरिक्त तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये मशाल पेटल्याने परिणामी त्याचा फटका गोडसे यांना बसून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. (Division of Maratha votes due to four way contest )

देवळाली मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण असा संमिश्र आहे. शहरी भागामध्ये नाशिक महापालिकेचा काही भाग येतो, तर त्यापुढे देवळाली कॅन्टोन्मेंट भाग येतो. जवळपास १८, ००० मतदान असलेल्या भगूर नगरपालिकादेखील याच मतदारसंघांमध्ये आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघामध्ये मोठ्या गावांचा समावेश होतो व ही गावे मराठाबहुल आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख चार उमेदवार मराठा समाजाचे होते.

त्यामुळे मतांचे विभाजन झाले. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे संसरी हे गाव देवळाली मतदारसंघामध्ये आहे. त्याचबरोबर गोडसे यांचे कार्यक्षेत्र बहुतांश स्वरूपात देवळाली हेच आहे. त्यामुळे येथून त्यांना मतदानाची आघाडी मिळणे अपेक्षित होते. मात्र मतांच्या विभागणीचा फटका त्यांना बसला. सिन्नर तालुक्याला लागून असलेल्या गावांमध्ये वाजे यांचा प्रभाव असल्याने त्याचा परिणाम महाविकास आघाडीचे वाजे यांच्या मतांचा टक्का वाढला.

अपक्ष शांतीगिरी जी महाराज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तालुक्यातील मतदान घेतल्याने गोडसे यांच्या मतांमध्ये वाटेकरी झाले. नाशिक तालुका हा बागायतदार शेतकरी व राष्ट्रवादीच्या बहुतांश विचारसरणीचा आहे. त्याची साथ वाजे यांना मिळाली. देवळालीत ५४ हजार ६४ मते हे महायुतीचे हेमंत गोडसे यांना मिळाली, तर ८१ हजार मतदान हे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झाले. वाजे यांनी २७ हजार १३६ मतांची आघाडी घेतली.

ऐन प्रचाराच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे भगूर येथून गोडसे यांना मतदान मिळेल, असे अपेक्षा होती. मात्र तेथे देखील मतांची टक्केवारी कमी झाल्याने भगूर नगरपालिकेमध्ये करजंकर यांनादेखील धोक्याची घंटा आहे. एकंदरीत देवळाली विधानसभा मतदारसंघाने आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट केली आहे. सुरवातीला महायुतीच्या बाजूने असलेला हा मतदारसंघ शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडे वळला. यात घरोघरी झालेला प्रचार हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला.

विजयाची कारणे

- ग्रामीण मतदारांनी दिलेली साथ.

- तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी विचारांचा असलेला प्रभाव.

- मराठा मतांचे चार उमेदवारांमध्ये विभाजन.

- ग्रामीण भागात भाजपची अपुरी यंत्रणा.

- महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन. (latest marathi news)

महायुतीच्या पराभवाची कारणे

- विलंबाने जाहीर झालेली उमेदवारी.

- गोडसे यांच्या मतांमध्ये वाटेकरी.

- तळागाळामध्ये नेटवर्कचा अभाव.

- शहरी भागातून कमी प्रतिसाद.

- दहा वर्षांची ॲन्टीइन्कमबन्सी.

नाशिक लोकसभा.....हेमंत गोडसे.....राजाभाऊ वाजे....आमदार

देवळाली.......५४०६४..........८१२००...........(२७ हजार १३६ मतांची आघाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT