Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of inauguration ceremony of Nagar Panchayat Administrative Offices. esakal
नाशिक

Nashik Ajit Pawar Daura : कळवण, सुरगाणासाठी आणखी 25 कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

कळवण : कळवण - सुरगाणा मतदारसंघातील विविध विकासकामांना आपण तब्बल २२०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदासंघातील अनेक प्रश्न यामुळे मार्गी लागणार असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास देत कळवण शहरासाठी १५ कोटी व सुरगाणा शहरासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली. (Another 25 crore for Kalwan Surgana marathi news)

कळवण नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, बेबीलाल संचेती, नारायण हिरे, सुधाकर पगार, नंदकुमार खैरनार, कारभारी पगार, के. के शिंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की माता-भगिनींसाठी आपण अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून सर्व पात्र माता-भगिनींच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. युवक मुला-मुलींसाठी ॲप्रेंटीस योजना सुरू केली आहे. त्याचाही मोठा फायदा युवकांना येत्या काळात होणार असल्याचे सांगितले.

कांदा निर्यातबंदी प्रश्नावर देखील त्यांनी भाष्य करताना निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कळवण -सुरगाणा मतदारसंघाने नेहमीच आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा असाच कायम राहील अशी आशा यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार नितीन पवार यांनी कांदा निर्यातबंदी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधत मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी कमी पडू दिला नाही. पुनंद प्रकल्पाला अर्जुनसागर नाव देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. ए. टी. पवार यांच्या कार्याचा गौरव केला. त्यामुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे यावेळी सांगितले. (latest marathi news)

कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष गौरव पगार, प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, मुख्याधिकारी नागेश येवले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, मजूर संघाचे चेअरमन रोहित पगार, मधुकर पगार, भावराव पगार, गजानन सोनजे, मुश्ताक शेख, योगेश महाजन, अरविंद कोठावदे, नंदकुमार खैरनार, मोहन जाधव, कडू पाटील, महेंद्र हिरे, मुरलीधर अमृतकर, नितीन वालखडे, योगेश मालपुरे, विलास शिरोरे, शशिकांत बागूल, शरद पगार, अतुल पगार, जयेश पगार, नगरसेवक तेजस पगार, राहूल पगार, मयूर बहिरम, मोतीराम पवार,हरीश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन मैंद, नगरसेविका रत्नाबाई पगार, ज्योत्स्ना जाधव, ताराबाई आंबेकर, लताबाई निकम, हर्षाली पगार, रोहिणी महाले, भारती पगार, भाग्यश्री शिरोडे, अजय मालपुरे किशोर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, सूत्रसंचालन राकेश हिरे तर आभार राजेंद्र भामरे यांनी मानले.

नगरसेविकांकडून सत्कार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून महिलांचा सन्मान केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बचत गटाच्या महिला प्रतिनिधी व कळवणच्या महिला नगरसेविकींनी सत्कार केला. तसेच कळवण शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्वाचे भूमिका बजावून शहरातील विकासकामे मार्गी लावून योगदान दिल्याबद्दल नगराध्यक्ष कौतिक पगार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार व कळवणकरांच्या वतीने सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT