Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : झेडपीच्या उपअभियंत्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुरगाणा तालुक्यातील दोन गावांचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडून दोन टक्क्यांप्रमाणे ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरगाणा उपविभागाच्या उपअभियंत्याला त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. (Deputy Engineer of ZP arrested while accepting bribe)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुंबई नाका परिसरातील लाचखोराच्या घरी संबंधित कारवाई गुरुवारी (ता. ९) सायंकाळी केली. दरम्यान, दोन दिवसांत लाचखोरीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. नंदलाल विक्रम सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. सोनवणे जिल्हा परिषदेच्या सुरगाणा उपविभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते.

तक्रारदार ठेकेदार असून, त्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम देण्यात आले होते. या कामावर सोनवणे यांना देखरेख करण्याचे अधिकार दिले होते. ठेकेदाराने संबंधित काम विहित वेळेत पूर्ण करून दिले होते.

परंतु त्यांना काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तक्रारदार यांना संबंधित प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दोन्ही कामासाठीच्या मंजूर निविदा रक्कम २० लाखांच्या दोन टक्क्यांप्रमाणे लाचखोर सोनवणे यांनी बुधवारी (ता. ८) ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार विभागाने पडताळणीनंतर गुरुवारी (ता. ९) सापळा रचला. संशयित लाचखोर सोनवणे याने मुंबई नाका परिसरात असलेल्या त्याच्या निवासस्थानी तक्रारदारास लाचेची ४० हजारांची रक्कम घेऊन सायंकाळी बोलावले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला आणि सोनवणेने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कामगिरी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांनी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT