Nashik News : सिडको परिसरातील पवननगर येथील नाशिक महानगरपालिकेच्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था दिसून येत आहे. सिडकोमधल्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या मैदानात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
परिसरातील अनेक हौशी तसेच नामवंत विद्यार्थी या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी तसेच सरावासाठी गर्दी करतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी हास्य क्लब भरतो. त्यातच या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Desecrate stadium in Pawan Nagar)
हे मैदान अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच गणपती विक्री स्टॉल व इतर कार्यक्रमांसाठी वापरासाठी दिले जाते. त्यामुळे येथील जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक वेळा या मैदानाची स्वच्छता केली जात नसल्याचे दिसून येते. मैदानातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नळ गळत्या अवस्थेत आहेत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला पाणी वाहण्यासाठी जागा नसल्याने त्या ठिकाणी गाजरगवत उगले आहे. त्यामुळे आहे त्या नाल्या बंद झाल्या आहेत. अनेक खेळणी तसेच व्यायाम साहित्याखाली पाणी साचून मोठे खड्डे तयार झाले आहेत.
या ठिकाणातील मैदानी सामने बघण्यासाठी बनवलेले ऑडिटोरियम मोठ्या प्रमाणात अस्वच्छ असून त्या ठिकाणी मद्यधुंद तरुण निद्रा अवस्थेत तसेच कुत्र्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो. येथील भिंतीवर मोठ्या प्रमाणात गुटखा थुंकल्याने तेथील वातावरण दूषित झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मैदानाची अशी अवस्था बघता येथे व्यायामास येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणची शोभा कायम राखण्यासाठी मैदानाच्या स्वच्छतेची मागणी केली आहे. (latest marathi news)
टवाळखोरांवर कारवाईची अपेक्षा
जॉगिंग ट्रॅक लगत नागरिकांच्या मनोरंजनासाठी उभारलेले रेडिओ स्पीकर अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे अशी म्युझिक सिस्टीम दुरुस्त करणे गरजेचे आहे. मैदानामागील स्वच्छतागृहांजवळ अनेकवेळा टवाळखोर तरुण समूहामध्ये बसलेले असतात.
या ठिकाणी अनेकवेळा असे तरुण मोठ्याने गप्पा करत तसेच विनोद करतात. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण असते. पोलिसांनी अशा टवाळखोरांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
"या मैदानामध्ये गाळेधारकांना तसेच धार्मिक कार्यक्रमांना जागा दिली जाते आणि कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मैदानाची आज दुरवस्था झालेली आहे."- शशिकांत सोनार, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.