Divisional Commissioner Gedam was the chief guest at the 17th Foundation Day function of Nashik Engineering Cluster. esakal
नाशिक

Nashik News : ‘इकॉनॉमी क्लस्टर’ म्हणून विकसित करा; सतराव्या स्थापना दिन सोहळ्यात विभागीय आयुक्त गेडाम यांचे प्रतिपादन

Nashik News : ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ हे शासकीय व खासगी क्षेत्राच्या भागीदारीचे उदाहरण असून, औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक सेवांबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाचीही जबाबदारी पार पाडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ हे शासकीय व खासगी क्षेत्राच्या भागीदारीचे उदाहरण असून, औद्योगिक क्षेत्राला तांत्रिक सेवांबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाचीही जबाबदारी पार पाडत आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी नाशिक औद्योगिक विकासाचे केंद्र बनावे लागेल व नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला ‘इकॉनॉमी क्लस्टर’ म्हणून विकसित व्हावे लागेल. (Nashik News)

कौशल्य प्रशिक्षण देऊन उद्योगांना प्रशिक्षित मन्युष्यबळ उपलब्ध करून देण्यात व रोजगारनिर्मितीत नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरची महत्त्वाची भूमिका असल्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष मनीष कोठारी, संचालक विक्रम सारडा, शरद शहा, अशोक बंग, नरेंद्र बिरार, हेमंत राठी उपस्थित होते. ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस निखिल पांचाळ, कार्यकारिणी सदस्य मनीष रावल, कैलास पाटील, ‘नाईस’चे अध्यक्ष रमेश वैश्य, व्यवस्थापक दिनेश पाटील,

‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब, सरचिटणीस प्रमोद वाघ, ‘सिमा’चे विश्वस्त रतन पडवळ, सचिव बबन वाजे, कार्यकारिणी सदस्य मुकेश देशमुख, अतुल अग्रवाल, ज्ञानेश्वर भागवत, किरण भंडारी, ‘सीआयआय’ नाशिकचे अध्यक्ष जॉय अलूर, सुधीर मुतालिक, ‘निपम नाशिक’चे अध्यक्ष राजाराम कासार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र कोठावदे, उमेश राठी आदी उपस्थित होते. (latest marathi news)

यंदा नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरने केंद्र सरकारच्या स्टार्टअप प्रकल्पांतर्गत ५१ विद्यार्थ्यांना १७ कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी दिली. या प्रकल्पात सहकार्य केल्याबद्दल १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींचा क्लस्टरच्या संचालक मंडळातर्फे सत्कार झाला.

यावेळी बोलताना क्लस्टरचे संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा म्हणाले, की नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा बिगर नफा तत्त्वावर चालणाऱ्या पीपीपी संस्थांच्या स्वावलंबी विकासाचे उदाहरण असल्याचा उल्लेख विविध यंत्रणांकडून होत असल्याचे सांगितले.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरद्वारे शहरातीलच नव्हे; तर ग्रामीण भागातील नवउद्योजकांनाही मदतउपलब्ध करून देण्यात आली. आजतागायत क्लस्टरच्या कार्याची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत गेली असून, भविष्यातही यशाचे नवनवीन टप्पे पार करेल व त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. सीईओ एस. के. माथूर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT