Nashik Lok Sabha Code Of Conduct  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेमुळे विकासकामे महिनाभर लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ जूनला संपुष्टात येत असताना त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने ३१ मेपासून विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक विभागाचादेखील या निवडणुकीत समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्रासाठी आचारसंहिता महिनाभर लांबणीवर पडली आहे. (Development works delayed for month due to code of conduct)

६ जुलैला आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर नियमित कामे सुरू होतील. महापालिकेसह सर्वच शासकीय विभागांचे कामे आचारसंहितेमुळे महिनाभर लांबणीवर पडणार आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. २० मेस नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणूक पार पडली. ४ जूनला लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे मतमोजणी होणार आहे.

१६ मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. ५ जूनला आचारसंहिता संपत असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित करण्यात आली. यापूर्वीदेखील निवडणूक घोषित करण्यात आली होती व १५ जूनला शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपुष्टात येणार होती.

परंतु त्या वेळी निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने नव्याने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मुंबई व कोकण पदवीधर तसेच नाशिक व मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित करण्यात आली. (latest marathi news)

३१ मेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल व पाच जुलैला निवडणूक प्रक्रिया संपेल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ५ जूनला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येत असली तरी शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाल्याने नाशिक विभागामध्ये ५ जुलैपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.

या कामांवर होईल परिणाम

- गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षक सल्लागार नियुक्ती.

- गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजना.

- दारणा धरण थेट पाइपलाइन योजना.

- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण.

- पथविक्रेता समिती सदस्यपदाची निवडणूक.

- वैद्यकीय व अग्निशमन कर्मचारी भरती प्रक्रिया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT