Development Works esakal
नाशिक

Development works : येवल्यात 23 कोटीच्या विकासकामांना मंजुरी!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ते व पुलांसह महसूल अधिकारी निवासस्थानाच्या कामांचा समावेश आहे. (Development works worth 23 crore have been approved in yeola)

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग ८ ते नांदेसर आडगाव चोथवा उंदीरवाडी बोकटे खामगाव ते प्रमुख राज्य मार्ग २ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ८० मध्ये सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख,अनकाई.

कुसमाडी, नगरसूल, अंदरसूल, पिंपळगाव जलाल रोड राज्य महामार्ग ४५१ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. लासलगाव -पाटोदा रस्त्यावरील राज्य महामार्ग १४ वरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ५० लाख, गाजरवाडी ते नांदूरमध्यमेश्वर ग्रामीण महामार्ग १२३ या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी. (latest marathi news)

वनसगाव, थेटाळे कोटमगाव प्रमुख जिल्हा मार्ग १७४ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व सुधारणा करण्यासाठी ३ कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. येथील महसुली अधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी ५१ लाखाचा निधी मिळाला आहे.

भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT