Devendra Fadnavis esakal
नाशिक

Nashik Onion Export : कांदा निर्यातीबाबत सुधारणा नक्की होतील : फडणवीस

Nashik News : कांद्याची निर्यातबंदी उठविली आहे, यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. कांदा निर्यातीबाबत आवश्यक त्या सुधारणा केंद्र सरकारकडे पाठविल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कांद्याची निर्यातबंदी उठविली आहे, यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. कांदा निर्यातीबाबत आवश्यक त्या सुधारणा केंद्र सरकारकडे पाठविल्या आहेत. आवश्यक त्या सुधारणा नक्कीच होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे असल्याचेही त्यांनी गुरुवारी (ता. २) सांगितले. ( Devendra Fadnavis statement Onion export reforms will definitely happen)

महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरीतील उमेदवार डॉ. भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्री. फडणवीस गुरुवारी नाशिकमध्ये होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की कांदा निर्यातबंदी उठविली आहे.

याबाबत सुधारणा करण्याची मागणी आहे. या मागण्या आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोचविलेल्या आहेत. निर्यातबंदीत आवश्यक त्या सुधारणा नक्कीच होतील, असेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचे प्रेम आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सगळे सोबत आहे. महायुतीतील उमेदवारीवरून मंत्री छगन भुजबळ नाराज नसून भुजबळ स्वतः रॅलीत सहभागी झाले आहेत.

महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असती, तर भुजबळ हेच उमेदवार राहिले असते. मात्र, ही जागा शिवसेनेला गेली आहे. महायुतीत सर्व एकत्र काम करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT