Ranragini in the chop committee formed by the Gram Panchayat to deal with drug addicts. esakal
नाशिक

Nashik News : नशेखोरांना अद्दल घडविण्यासाठी धोंडाळपाडा ग्रामपंचायतीने केली 'चोप' समिती गठित! ठराव महिला ग्रामसभेत संमत

Latest Nashik News : महिलांची 'चोप' समिती तयार करण्यात आली असून नशा करून मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यास चांगला चोप देण्याचा ठराव महिला ग्रामसभेत संमत केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वणी : वृध्द आई - वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीच्यावतीने देणारे दाखले व शासकीय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा ग्रामसभेत ठराव करुन चर्चेत आलेल्या दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा ग्रामपंचायतीने आता गावातील नशेखोरांना अद्दल घडविण्यासाठी जालीम उपाय शोधला आहे. यासाठी महिलांची 'चोप' समिती तयार करण्यात आली असून नशा करून मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यास चांगला चोप देण्याचा ठराव महिला ग्रामसभेत संमत केला आहे. (Dhondalpada Gram Panchayat formed Chop Committee to deal with drug addicts)

गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अल्पवयीन मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण विविध प्रकारच्या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. यातून गावात दररोज कुणाच्या ना कुणाच्या घरी भांडण-तंटा ठरलेलाच आहे.

इतकेच नव्हे, तर हे लोक गावात कुणाचे लग्न, सप्ताह, गणेशोत्सव अशा विविध सणावाराला नशा करून धिंगाणा घालतात. त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन गावगाडा विस्कळित होत आहे. यासाठी धोंडाळपाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा नुकतीच झाली.

या ग्रामसभेत गावातील मद्यपी, व्यसनाधिनांमुळे त्यांच्या कुटुंबासह ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाचा विषय चर्चेला आला. यात गावातील तरुणांबरोबरच, शाळकरी मुले, ज्येष्ठांपर्यंत अनेक जण मद्यपान, चरस, गांजा अशा व्यसनांच्या आहारी गेल्याचे लक्षात आले. यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, तर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे.

ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी झाली. अखेर याबाबत चर्चेअंती भविष्यात गावगाडा सुरळीत चालावा तसेच व्यसनाधिनतेला आळा बसावा यासाठी अशा नशेखोरांना धडा शिकविण्याचा ठराव ग्रामपंचायतीने संमत केला. यात गावामध्ये नशा करून कुटुंबाला तसेच ग्रामस्थांना त्रास देणाऱ्यास चोप देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी गावातीलच खमक्या महिलांची समिती स्थापन करण्यात आली असून, जे युवक व्यसन करून त्रास देतील, त्यांना ही समिती धडा शिकविणार आहे. ग्रामसभेला उपसरपंच मधुकर हिंडे, ग्रामसेवक विजय पवार यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (latest marathi news)

महिलांची 'चोप' समिती

अध्यक्षपदी कविता गहिले, उपाध्यक्षपदी भारती पाडवी, सचिव चंद्रकला हिंडे, तर सदस्यपदी सावित्रा हिंडे, उषा हिंडे, कांता गहिले, अनुसया हिंडे, जना गहिले, हिरा हिंडे, सरला गायकवाड, अनसूया वाघमारे, मंजुळा गहिले, शांता वाघमारे, यशोदा पवार, लता हाडस, मालती गहिले, यमुना गहिले, जना वाघमारे, लक्ष्मी गहिले, पोलिसपाटील भारती हिंडे यांचा या समितीत समावेश आहे.

"मद्यपींमुळे गावातील शांतता भंगण्याच्या मार्गावर आहे. शांततेच्या मार्गाने तळीराम ऐकत नाहीत. त्यामुळे आता चोप देऊन नियमानुसार त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे हा उपाय पुढे आला आहे. या निर्णयामुळे व्यसनाधिनतेला नक्कीच आळा बसेल."

- लता गायकवाड, सरपंच, धोंडाळपाडा, ता. दिंडोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT