Exam Energetic Diet esakal
नाशिक

HSC-SSC Exam Diet: परीक्षा काळात कसा असावा आहार? अभ्यासाच्या सततच्या बैठकीमुळे येतेय स्थूलता, ग्लानी; डॉक्टर काय सांगतात ?

Health News : डॉक्टर परीक्षेच्या कालावधीत शरीराला ऊर्जा देणारा आहार घेण्याचा सल्ला आवर्जून देतात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त तणावाचा असतो. विद्यार्थी तहानभूक विसरून आहाराकडे दुर्लक्ष करून सतत अभ्यास करतात. सततच्या सलग बैठकीमुळे शरीराला स्थूलता, मरगळ आणि ग्लानी येते. व्यायामाच्या (Excercise) अभावाने परीक्षा काळात नकारात्मक भाव मनात निर्माण होतो. अशावेळी डॉक्टर परीक्षेच्या कालावधीत शरीराला ऊर्जा देणारा आहार घेण्याचा सल्ला आवर्जून देतात. (nashik Student Exam Energetic Diet marathi news)

जोपर्यंत पेपर संपत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे टेन्शन काही संपत नाही. सध्या परीक्षा, सबमिशनचा काळ सुरू आहे. जोडीला फेब्रुवारीत उन्हाळ्याची चाहूल जाणवत आहे. एकतर परीक्षेचे दडपण त्यात पोटात गोळा आलेला. एखादा पेपर अवघड गेला तर, आवडता पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही आणि जबरदस्तीने जेवण पोटात ढकलावे लागते.

या परिस्थितीतीतून सर्वजण जातात. त्यात पुस्तक बघून भूकही नाहिशी झाल्याने दिवसभर पाण्यावर राहायची वेळ आली तरी मूल काहीही न खाता पिता तशीच राहतात. कारण दडपण, तणाव. आहाराकडे दुर्लक्ष केल्यास शरीराची ऊर्जा कमी होऊन अशक्तपणा आणि ऐन परीक्षेत आजारी पडण्याची शक्यता असते.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात जडपदार्थ न खाता हलका आहार घ्यावा. अगदीच भाजी-पोळी खाण्यास नको वाटत असल्यास पचनास हलके असलेले तृणधान्य जसे भगर, नागली, राजगिरा यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

शरीराला ऊर्जा देणारे जीवनसत्त्व सी असणारे संत्री, मोसंबी फलाहार घ्यावा. फळांचा ज्यूस न घेता पूर्ण फळ खावीत. चहा, कॉफीऐवजी नारळपाणी, ताक सारखे द्रव पदार्थ घ्यावेत. सुकामेवा, उपमा, इडली, डोसा यासारखा हलका आहार घेतल्याने शरीर आणि मन प्रसन्न राहते. (Latest Marathi News)

कोणता आहार घ्यावा

*गोड खावेसे वाटल्यास राजगिरा गुळाचा लाडू खावा

*आहारात सलाडचे भरपूर प्रमाण वाढवावे

*गाजर कट करून न खाता आख्खे खावे

*ज्वारी-नागली मिश्र भाकरी खावी

*सकाळच्या प्रहरी खोबरे आणि खारीक एकत्र खावी

* जवस आणि तीळ एकत्र खाल्यास ताकद मिळते

"परीक्षेच्या काळात विद्यार्थी सलग आठ-नऊ तास अभ्यास करतात त्यानंतर पिझ्झा सारखे फास्ट फूड खातात. यामुळे वजन वाढते हा पूर्णपणे चुकीचा आहार ठरतो. पालकांनी परीक्षेच्या काळात मुलांच्या आहाराची काळजी घ्यायला हवी. आता उन्हाळा सुरू होत असल्याने शरीरातील उष्णता वाढते त्यासाठी दररोज आहारात सलाडचा समावेश करावा."- डॉ. संदीप जोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT