Dr. Bharti Pawar, Chandrasekhar Bawankule  esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : बावनकुळे यांचे सूक्ष्म नियोजन डॉ. भारती पवारांना तारेल का?

Lok Sabha Constituency : दिंडोरीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सुक्ष्म नियोजन डॉ. भारती पवार यांना तारेल का, अशा चर्चा नागरिकांत झडू लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’चा चा नारा दिल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांनी प्रत्येक जागा प्रतिष्ठेची करून त्या दृष्टीने व्यूहरचना आखली आणि सर्वांनी झपाटल्यासारखे काम केल्याने आता ४ जूनच्या निकालानंतर खरेच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी कोण निवडून येणार आणि भाजपप्रणित एनडीए हॅट्‌ट्रिक करणार की इंडिया आघाडी सत्तेवर येणार याबाबत आता जोरदार पैजाही झडू लागले आहेत. (Dindori Lok Sabha Constituency)

दिंडोरीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सुक्ष्म नियोजन डॉ. भारती पवार यांना तारेल का, अशा चर्चा नागरिकांत झडू लागल्या आहेत. भाजपातर्फे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बुथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा अहवाल मागवून आता त्यावर विचार मंथन सुरू झाले आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीसाठी सुरुवातीला प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र विरोधकांनी रंगविले होते.

सोशल मीडियावर त्यादृष्टीने जोरदार मोहीमही उघडण्यात आली होती. विद्यमान खासदारांना टार्गेट करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही झाला. परंतु भाजपा तसेच मित्र पक्षांच्या अगदी तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांपर्यंत सर्वांनी आपली ताकद लावून नाशिक आणि विशेषत: दिंडोरी मतदार संघ जिंकण्यासाठी जे काही सूक्ष्म नियोजन केले त्याला निश्चितच तोड नाही.

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे आजच विजयी झाले आहेत, अशी आवई उठवून देऊन विरोधकांनी रान पेटविल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी सूक्ष्म नियोजन करून दिंडोरी मतदारसंघात संपूर्ण फौजफाटा पाठवून दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांच्यात एकवाक्यता निर्माण केल्याने ते जीव तोडून कामाला लागले आणि हळूहळू दिंडोरी मतदारसंघाचे चित्र बदलू लागले. (latest marathi news)

दिंडोरीसाठी भारती पवार यांचे नाव जाहीर झाल्या दिवसापासूनच बावनकुळे यांनी या मतदारसंघात जातीने लक्ष घालण्यास प्रारंभ केला. कार्यकर्त्यांकडून आलेल्या छोट्या मोठ्या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यानुसार उपाययोजना सुरू झाली. राम शिंदे,पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर यांच्या सभा हव्यात अशा सूचना आल्यानंतर बावनकुळे यांनी तातडीने या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले.

आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक असलेल्या मराठा समाज मनधरणी करून त्यांचा विश्वास संपादान करण्यात बावनकुळे यांना मोठे यश आले. कांदा प्रश्नाबाबत काय उपाययोजना करावी याबाबत कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादकांना दिलासा देणारे धोरण भाजप सरकार निश्चितच हाती घेईल आणि कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही.

अशी हमी देण्यात बावनकुळे यशस्वी ठरले. डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भर उन्हात पिंपळगाव बसवंत येथे झालेली सभा तर विरोधकांच्या पोटात गोळा उठवणारीच ठरली. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सभासुद्धा भारती पवार यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू ठरल्या. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सलग ३ दिवस नाशकात तळ ठोकून मतदानाचा टक्का वाढविण्याचे नियोजन केले.

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा गट सक्रिय नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध संघटनांचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या सर्व भागात पाठवून संपूर्ण परिसर पिंजून काढून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला.

दिंडोरी मतदार संघात सुरुवातीला विरोधकांनी चांगलीच बाजी मारली होती. परंतु बावनकुळे यांचे नेतृत्व आणि त्यांनी या मतदारसंघासाठी घेतलेले परिश्रम आणि कार्यकर्त्यांची उभी केलेली फळी त्या माध्यमातून झालेला प्रचार बघता 'सौ सुनारकी एक लोहारकी' असा मास्टरस्ट्रोकच बावनकुळे यांनी लगावल्याने अखेरच्या काही दिवसांमध्ये दिंडोरीत भारती पवार यांचे पारडे जड झाले, असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT