Dindori Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : सर्वच उमेदवार बनले 'खासदार'! आपल्याच नेत्याचा 'निकाल' लावून कार्यकर्ते मोकळे

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी तब्बल आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, उत्साही पदाधिकारी, कार्यकर्ते मतदानाची आकडेमोड करून आपल्याच नेत्याला सोशल मीडियावर विजयी घोषित करून मोकळे होत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविलेले सर्वच पक्षांचे उमेदवार 'खासदार' बनल्याची खुमासदार चर्चा नेटीझन्समध्ये रंगू लागली आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

या चढाओढीत महाविकास आघाडी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस मतदान पार पडले. १२ लाख ३७ हजार १८० मतदारांनी हक्क बजावला. ६६.७५ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली. ही लढत बहुरंगी वाटत असली तरी खरा सामना हा महाविकास आघाडीचे भास्कर भगरे व महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्यात झाला.

कोणत्या उमेदवाराने कुणाची मते खाल्ली, कोण जिंकणार, कुणाचा पराभव होणार, हे ता. ४ जून रोजी निकालातून स्पष्ट होईल. परंतु, त्याआधीच अनेक अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गोळाबेरीज करून आपल्या नेत्यांना विजयी घोषित करून 'खासदार' ही बनवून टाकले आहे. यंदाच्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तो जोश होता. मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले.

मतदारांना घराबाहेर काढणे, मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे, पुन्हा घरापर्यंत सोडणे अशा प्रकारे प्रथमच लोकसभेला मतदान करून घेतले गेले. यंदा पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येच उत्साह दिसून आला. बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी, कार्यकर्ते तटस्थ होते. निफाड मतदारसंघातील अनेक किंगमेकर नेते, पदाधिकारी हे निवडणूक प्रक्रियेत कुठेच दिसून आले नाहीत. (latest marathi news)

त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे राजकीय विश्लेषकांनाही अवघड झालेले आहे. अशात उमेदवारांच्या 'जवळचे' पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र हार मानायला तयार नाहीत. कोणत्या भागात किती मतदान कुणाला मिळाले, याची टोटल मारून आमच्याच नेत्याचा विजय होणार, असे दावे ते करू लागले आहेत. मतमोजणीपूर्वीच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर 'निकाल' जाहीर करून टाकला. सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

यंदाची लढत अटीतटीची...

गत वेळी झालेली दिंडोरी लोकसभेची निवडणूक भाजपा डॉ.भारती पवार यांनी दोन लाखाच्या मताधिक्याने एकतर्फी जिंकली होती.यंदा मात्र तशी अजिबात स्थिती नाही.मताच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.त्यामुळे अंदाज लावणे अवघड झाले आहे.त्यात दिंडोरी,निफाड,येवला या विधानसभा मतदारसंघाचा कल तुतारीच्या बाजुने राहिल्याचे बोलले जात आहे. तर नांदगाव, चांदवड, कळवण येथे कमळाला साथ मिळाल्याचा कयास आहे. त्यामुळे या लढतीचा निकाल लाखात नव्हे; तर हजारात असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT