Dr. Bharti Pawar and teacher Bhaskar Bhagare esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : कांदामय निवडणूकीचा कौल अधांतरी; 75 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर

रामदास कदम

दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जातीयवाद बाजूला ठेवून इतिहासात पहिल्यांदा शेतकरी शेती प्रश्नावर एकत्र झाल्याचे पहावयास मिळाले. यात कांदा, द्राक्ष, रस्ता, वीज व वाढती महागाई आदी प्रश्नांबरोबर डॉ. भारती पवार व शिक्षक भास्कर भगरे यांच्यातच खरी दुरंगी लढत झाली. कांदा प्रश्‍नामुळे गाजलेल्या निवडणूकीच्या उत्तरार्धात झालेल्या डावपेचांमुळे या निवडणूकीचा कौल अधांतरी असल्याचे चित्र आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार या दिग्गज नेत्यांसह महायुती व महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी मतदारसंघ ढवळून निघाला आहे. त्याबरोबरच यंदा दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक ७५ टक्के झालेले मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडते, याकडे जनतेसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भाजप अर्थात केंद्रसरकारला धडा शिकवण्याची हिच योग्य वेळ आहे, यासाठी विरोधी गट एकत्र आला होता.तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न अतिशय जटील झाला आहे. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत भरीव असे कुठेही काम दिसत नाही.

त्यामुळे शेतकरी एकवटल्याचे दिसून आले. सुरगाणा येथील आमदार जीवा पांडू गावित यांनी या निवडणुकीत माघार घेतल्यामुळे त्यांच्या पक्षाचे हक्काचे दीड लाखाचे मतदान भास्कर भगरे यांच्या बाजूने फिरले, ही जमेची बाजू आहे. मोहाडी येथील शहाजी सोमवंशी व त्यांचे विरोधक मविप्रचे तालुका संचालक प्रविण जाधव तसेच गाव एकत्र आल्याने एक गठ्ठा मतदान भगरे यांच्या पारड्यात पडले. (latest marathi news)

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे युवा नेते सचिन बर्डे व कावळे हे पक्षाचा राजीनामा देऊन विरोधी गटाला जाऊन मिळाले, त्यामुळेही भास्कर भगरे यांचे पारडे जड झाले. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना नाशिक व दिंडोरी विधानसभा मतदारसंघ जवळचा असल्याने त्यांनी नाशिक ते दिंडोरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले.

या मतदार संघात जनसंपर्क मोठ्या प्रमाणात ठेऊन गेल्या पाच वर्षांत तालुक्यात ठिकठिकाणी कामे हाती घेतली. तसेच देशाच्या दृष्टीने मोदी हे महत्त्वाचे नेते असल्याने तरुण मतदारांनी पुढाकार घेऊन मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे मोदी सरकार ४०० पार करणार असल्याची चर्चा मतदार करीत आहेत. तसेच मध्यम नोकरदार वर्ग ही भाजपची जमेची बाजू मानली जात आहे.

ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम असल्याने डॉ. भारती पवार विजयी झाल्यास महायुतीच्या आमदारांचे कर्तृत्व उजळून निघेल व ते पुन्हा नव्याने कामाला लागतील.तसेच महायुतीतील मित्रपक्षाचे येवला येथील आमदार भुजबळ यांच्यावर मराठा समाजाचा रोष कमी आहे हे सिद्द होऊन त्यांचा पुढील मार्ग सुकर होईल.

तर भास्कर भगरे यांचा विजय झाल्यास महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांचे कर्तृत्व सिद्ध होईल. तसेच कुणाल दराडे यांचे कर्तृत्व उजळून निघेल व राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळून कादवा कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे यांना कादवा ताब्यात ठेवण्यासाठी बळकटी मिळेल.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील सर्वच विद्यमान आमदार हे महायुतीसोबत असतांना डॉ. भारती पवार यांचा पराभव झाल्यास लोकप्रतिनिधी विरुद्ध जनमत हे नवे चित्र बघायला मिळेल. या वेळी मतदारांनी ठिकठिकाणी कांदा व टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून मतदान केले, यातून इंडिया विरुद्ध भारत असे चित्र दिसून आले. नेमका रोष होता की, जमेची बाजू यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT