Dindori Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : शेतकरी, कांदा प्रश्नाने लावला भाजपच्या गडाला सुरुंग

Lok Sabha Constituency : भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अर्थात महाविकास आघाडीने अखेर आपल्याकडे खेचून आणला.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गत तीन लोकसभा निवडणुकीपासून भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अर्थात महाविकास आघाडीने अखेर आपल्याकडे खेचून आणला. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेल्या असंतोषाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसल्याने पंधरा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला हा गड महाविकास आघाडीला आपल्या ताब्यात घेण्यात यश आले. (Dindori Lok Sabha Constituency)

मतदारसंघात कांदाप्रश्नी केंद्र सरकारचा ग्राहकधार्जिण्या हस्तक्षेपामुळे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा मनात असलेला रोष, नाफेड व एनसीसीएफ कांदा खरेदीत गोंधळ, फुटलेली शिवसेना, गद्दारीचा आरोप यातच राष्ट्रवादी व भाजपमधील असमन्वयचा अभाव, मंत्रीपदाच्या कालावधीत भरीव कामे झाली नसल्याचा जनतेच्या मनात राग तसेच सर्वसामान्य जनतेशी तुटलेला जनसंपर्क यासह कार्यकर्त्यांच्या फळीत वाढलेली दरी, पक्षातंर्गत असलेली नाराजी यामुळे भाजपचा पराभव झाला.

याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वसामान्य व एकनिष्ठ उमेदवार देत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील नाराजीचा फायदा उचलत कांदाप्रश्नी सत्ताधारी भाजपची कोंडी केली. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याने दिंडोरी हा बारामतीनंतर राष्ट्रवादीसाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असतानाही पवारांना तो आजवर काबीज करता आला नव्हता. भाजपने मात्र सलग पाचव्यांदा हा गड काबीज करण्यासाठी शक्ती पणाला लावली होती. मात्र, मतदारसंघातील शेतकरी अन्‌ कांदा प्रश्न सत्ताधारी भाजपला भोवले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना भाजपने पुन्हा संधी देत रिंगणात उतरविले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरू झालेल्या प्रचारात कांदा प्रश्न ऐरणीवर होता. या प्रश्नांने उमेदवारासह पर्यायाने भाजपची कोंडी केली. सोशल मिडीयात अगदी आक्रमकपणे या प्रश्नी प्रचार केला. याची झळ बसू शकते हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने आचारसंहितेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी निर्यात खुली केली. (latest marathi news)

या बंदीमुळे पाच महिन्यांत झालेले नुकसान, हा प्रचारात विरोधकांनी कळीचा मुद्दा ठरविला. तशीच काहीशी स्थिती द्राक्षांची राहिली. भरमसाठ आयात शुल्कामुळे कित्येक दिवस बांग्लादेशात द्राक्षे निर्यात होऊ शकली नाहीत. विरोधकांनी स्थानिक मुद्यांवर आक्रमक प्रचार करीत वातावरण तापविले. तर, डॉ. पवार यांनी प्रथमच झालेली कोट्यवधींची सरकारी कांदा खरेदी, उत्पादकांना दिलेले अनुदान यावर प्रत्युत्तराची मांडणी केली.

त्यासाठी पंतप्रधान मोदी यांची पिंपळगाव येथे जाहीर सभा देखील घेतली. या सभेतून कांदा प्रश्नावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही सभा कांद्याने गाजली. मतदानापर्यंत पोहचलेल्या या कांद्याने भाजपचा पिच्छा अखेरपर्यंत सोडला नाही. तो प्रत्यक्ष मतदानातून देखील दाखवून दिला. डॉ. पवार यांच्या पहिल्याच यशाने मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर सामान्यांच्या अपेक्षा उंचाविल्या होत्या. मात्र, कोणतेही ठोस काम अथवा प्रकल्प उभा राहू शकला नाही.

डॉ. पवार यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. ही नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत मांडल्यानंतर, त्यावर तोडगा न काढता दाबून नेण्याचा प्रयत्न झाला. परिणामी, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते फारसे सक्रीय दिसले नाहीत. डॉ. भारती पवार यांनी मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यापासून मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क कमी झाला. यातच त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीवर, पक्षांसह सामान्यांची मोठी नाराजी होती.

ही नाराजी दूर करण्यात डॉ. पवार अयशस्वी ठरल्या. महायुती असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक चार आमदार मतदारसंघात होते. मात्र, त्यांना फारसे विश्वासात न घेता उमेदवारी लादण्यात आली. या आमदारांचे अखेरपर्यंत सुत जमले नाही. प्रचाराच्या अखेरच्या टप्यात डॉ. पवार कौटुंबिक कलह मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतू, अनेक वर्षांचा असलेला हा कलह एका भेटी अन्‌ चर्चेतून मिटला नसल्याचे मतदानातून दिसले.

कांदाप्रश्न अन्‌ शेतक-यांमधील रोष हेरून महाविकास आघाडी आणि उमेदवार भास्कर भगरे पहिल्या दिवसापासून कामाला लागले होते. याच मुद्यावर त्यांनी रान पेटविले. कधी नव्हे; इतका सोशल मिडियावर अगदी आक्रमकपणे प्रचार केला. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यात त्यांना यश मिळाले. सर्वसामान्य़ उमेदवार देत शरद पवार यांनी आधीच बाजी मारली होती. यातच, विश्वासू ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी मतदारसंघ पिंजून काढत, विस्कळीत झालेली महाविकास आघाडीतील नेत्यांची घडी एकत्र बसविली.

राष्ट्रवादीच्या आमदारांमधील असलेली नाराजीही हेरून रणनीती आखण्यात शेटे यशस्वी ठरले. धनशक्ती कमी असतानाही, त्याचा बाऊ न करता लोकांच्या हातात निवडणुक देण्यात महाविकास आघाडी पर्यायाने शरद पवार यशस्वी झाले. शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालीत, सर्वांशी समन्वय साधत शेतकऱ्यांना तसेच मानणाऱ्या वर्गाला अंत:करणापासून साद घातली. पवारांविषयीची सहानुभूती अन्‌ शेतकऱ्यांना घातलेली साद ऐकून मतदारांनी भरभरून मतदान करीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सूपूर्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT